आमिर खानसोबत चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला लहानपणीचा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडियावर नेहमीच कोणतीनकोणती सेलिब्रिटी आपल्या लहानपणीचे फोटो शेअर करत असते. नुकताच एका अभिनेत्रीने तिचा लहानपणीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोत अभिनेत्री आपल्या आईसोबत दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्ही विचारात पडाल कि, कोण आहे ही अभिनेत्री? या अभिनेत्रीचे अमिर खानशी कनेक्शन आहे. या अभिनेत्रीने आमिर खानसोबत सुपरहिट चित्रपट देखील केला आहे.

या अभिनेत्रीने इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे फातिमा सना शेख. हीला बॉलिवूडमध्ये ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखले जाते. हा फोटो शेअर करुन फातिमाने लिहले की, ‘पहा मला रडताना पाहून माझी आई किती खुश दिसत आहे. मला शिक्षणाची अजिबात आवड नव्हती.’ फातिमाच्या या फोटोंना युजर्स कमेंट करत आहे.

एका युजरने लिहले की, ‘टॉम अॅण्ड जेरीचा एपिसोड संपणार आहे, आता शिक्षण घे.’, ‘दुसऱ्या युजरने लिहले की, ‘असे वाटत आहे की, तुला आठवड्याचा अभ्यास करायचा आहे’, एका युजरने लिहले की, ‘मला तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे तु क्लासमध्ये टॉप असेल.’ फातिमा सना शेख आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ दिसून आली होती.

View this post on Instagram

@theweddingjunction_show @shivikafacepaint @shnoy09

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

असा अंदाज लावला जात आहे की, चित्रपट बॉक्स ऑफीसवर धमाल करणार. फार कमी लोकांना माहित आहे की, फातिमाचे करिअरची सुरुवात १९९७ मध्ये चित्रपट ‘इश्क’ मधून झाली होती. यानंतर तिने ‘चाची ४२०’, ‘बड़े दिलवाले’, ‘वन टू का फोर’, ‘बिट्टो बॉस’, ‘आकाशवाणी’ मध्ये दिसून आली.

फातिमाला ‘दंगल’ चित्रपटापासून खूप प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये फातिमाने महिला पहिलवान गीता फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

 

 

 

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

 

 

Loading...
You might also like