‘ABCD’ सिनेमातील अभिनेता किशोर शेट्टी ड्रग्सची विक्री आणि सेवन केल्याप्रकरणी अटक, CCB नं पकडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रग्ज प्रकरणात मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. आता ‘ ABCD’ चित्रपटात काम करणारा किशोर शेट्टी पकडला गेला आहे. अभिनेता असण्या व्यतिरिक्त किशोर शेट्टी एक डान्सर आणि कोरिओग्राफर देखील आहेत. 30 वर्षीय किशोर शेट्टीला मेंगलुरु पोलिसांनी अटक केली आहे. किशोर व्यतिरिक्त पोलिसांनी 28 वर्षीय अकील नौशील यालाही अटक केली आहे. या दोघांवर मेथिलीन डायऑक्सिमेथेम्फेमाइन (प्रतिबंधित ड्रग्सचा एक प्रकार) घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, किशोर अमन शेट्टी प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’ मध्ये सहभागी म्हणून सामील झाला आहे. याशिवाय तो ABCD: Any Body Can Dance’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसला. मेंगलुरु पोलिस आयुक्तांनी सांगितले कि, किशोर व अकील हे मुंबईहून ड्रग्स आणून कर्नाटकातील मेंगलुरु शहरात विक्री करीत असत. शनिवारी सकाळी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकी, मोबाईल फोन आणि MDMA जप्त केले. अकील नौशील हा यापूर्वी परदेशात सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी तो भारतात परत आला आणि मेंगलुरू येथे ड्रग्सची विक्री करण्यास सुरवात केली. तो बेंगळुरू आणि मुंबईहून ड्रग्सचा माल आणत होता .

असे सांगितले जात आहे कि, ते दोघेही पैशांसाठी ड्रग्स खरेदी करण्यात आणि विकण्यात गुंतलेले होते आणि स्वतः देखील ड्रग्स घेत असे. पोलिसांनी स्पष्ट केले कि, आता त्यांच्या चौकशीत मुंबईतील मादक पदार्थांचे कनेक्शन शोधून काढले जाईल. या प्रकरणी नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तपास यंत्रणा सध्या अधिक तपास करत आहे.

दरम्यान, नुकतेच सुशांत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) आणखी एक यश मिळाले आहे. एनसीबी मुंबईने एक ड्रग पेडलर राहिल विश्रामला एक किलो चरससह ताब्यात घेतले आहे. स्वत: एनसीबीचे विभागीय संचालक यांनी ही माहिती दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like