Sanjana Sanghi IMDb Breakout Star of 2020 : ‘दिल बेचारा’मधील अ‍ॅक्ट्रेस संजना संघी बनली IMDb ब्रेकआउट स्टार 2020

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) मधील अ‍ॅक्ट्रेस संजना संघी (Sanjana Sanghi) हिला आएमडीबी (IMDb) च्या ब्रेकआउट स्टार 2020 (Breakout Stars of 2020) च्या यादीत पहिलं स्थान मिळालं आहे. मुकेश छाबडा (Mukesh Chhabra) नं दिल बेचारा सिनेमाचं डायरेक्शन केलं होतं. यात संजनानं फीमेल लिड रोल साकारला होता. आयएमडीबीच्या ब्रेकआउट यादीत संजना टॉपवर आहे. ही माहिती कळाल्यानंतर तिनं सोशलवर चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि याला स्वप्न म्हटलं आहे.

संजनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोत ती स्माईल करत पोज देत आहे. यासोबत तिनं एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यात आयएमडीबी बेस्ट ऑफ 2020 मध्ये तिचं नाव दिसत आहे.

या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, यापेक्षा जास्त हसू शकत नाही. मला हसणंही कंट्रोल होत नाही. या सन्मानासाठी आभार. या वर्षातील नंबर 1 ब्रेकआउट स्टार घोषित केलं जाणं एक स्वप्न आहे.

यात पुढं ती म्हणते, जगातील सर्वोत्तम प्रेक्षकांसाठी, हे आधी तुमचं आहे आणि नंतर माझं. हे तुमच्यामुळंच झालं आहे. मी सर्वांची आभारी आहे, असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

IMDb च्या या यादीत संजना सर्वांत टॉपवर आहे. यानंतर ईशा तलवार, हर्षिता गौर, स्वस्तिका मुखर्जी आणि अहाना कुमरा आहे. हंसल मेहताची वेब सीरिज स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरीमध्ये दिसलेली अभिनेत्री श्रेया धन्वंतरीनं या यादीत 6 व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी, जयदीप अहलावत निथ्या मेनन आणि निहारिका यांनीही टॉप 10 मध्ये जागा बनवली आहे.

संजनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकर ती ओम : द बॅटल विदीनमध्ये झळकणार आहे. या सिनेमात आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिकेत आहे.