करण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ‘खुलासा’ !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड इंडस्ट्री सध्या सर्वात कठीण अवस्थेतून जात आहे. एनसीबीने ड्रग प्रकरणात वेग पकडला असून त्याचा तपासही सखोलपणे करण्यात येत आहे. सर्वांची दीर्घ चौकशी सुरू आहे. त्यात दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे जोडली गेल्याने हे प्रकरण अधिक प्रकाशझोतात आले आहे. आता करण जोहरच्या एका पार्टीला देखील यात सामील करण्यात आले आहे, असा दावा केला जात आहे की पार्टी दरम्यान कलाकारांनी ड्रग्सचे सेवन केले होते. या पार्टीकडे एनसीबीचे लक्ष लागून आहे. चौकशीत एक नवीन खुलासा समोर आला आहे, त्यानुसार हे स्पष्ट झाले आहे की पार्टी दरम्यानचा हा व्हिडिओ खरा आहे आणि तो एडिट करण्यात आलेला नाही.

सूत्रानुसार, सन 2019 मध्ये करण जोहरच्या पार्टीचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला असून तो एनसीबीने सबमिट केला आहे. फॉरेन्सिक अहवालात हा व्हिडिओ वास्तविक असल्याचे समोर आले असून त्यामध्ये कोणतेही एडिटिंग केले गेले नाही. मल्होत्रा आणि डीडीजी अशोक जैन यांच्या नेतृत्वात या संदर्भात बैठकही घेण्यात येणार आहे. यामध्ये एनसीबी आणि डीजीशी संभाषण करून निर्णय घेतला जाईल की या प्रकरणाची पुढील कारवाई काय असेल.

करण जोहरने निवेदन जारी करत म्हटले होते की मी ड्रग्स घेत नाही किंवा त्यास प्रमोटही करीत नाही. 28 जुलै 2019 रोजी माझ्या घरी आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्स वापरण्यात आल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तसेच करण जोहर म्हटले की, 2019 लाच ते म्हणाले होते की हे सर्व आरोप खोटे आहेत. क्षितिज आणि अनुभव यांना मी ओळखत नाही असे करण जोहरने म्हटले आहे. ते म्हणाले की दोघेही धर्मा प्रॉडक्शनचे अधिकारी नाहीत. करणने म्हटले आहे की क्षितीज नोव्हेंबर 2019 मध्ये करारावर होते. अनुभवने धर्म प्रोडक्शनमध्ये अवघ्या दोन महिन्यांपर्यंत काम केले होते. करणने कायदेशीर कारवाई करण्याबाबतही म्हटले आहे.

एनसीबी 12 स्टार्सची करेल चौकशी

दरम्यान, या प्रकरणाविषयी आणखी एक खुलासा करण्यात येत आहे. क्षितिज प्रसाद यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी बचावादरम्यान सांगितले की कस्टडीमध्ये क्षितिजला टॉर्चर करण्यात आले की त्याने करण जोहरचे नाव घ्यावे व त्यांना अडचणीत आणावे. त्यांनी असा दावा केला आहे की सिगारेटच्या बडला ड्रग समजले जात आहे. या प्रकरणात पुढे काय घडते आणि एनसीबी करण जोहर सोबत ड्रग अँगलबाबत काय निर्णय घेईल हे आगामी काळात समोर येईल. सध्या असे मानले जात आहे की करण जोहरच्या पार्टीच्या आधारे 12 स्टार्सची नावे समोर आली आहेत, ज्यांची एनसीबी चौकशी करू शकते.