बॉलिवूडमधील ‘या’ टॉपच्या ७ सिनेमांमध्ये खुद्द ‘मान्सून’ने साकारली ‘भूमिका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तापत्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर प्रत्येकालाचा मान्सूनची प्रतिक्षा असते. सध्या मान्सूनचे आगमन झाले आहे. बॉलिवूडमध्येही  अनेक सिनेमे असे आहेत ज्यांचे सीन पावसात शुट केले गेले आहेत. सिनेमातील पात्रांनी पावसात शुट केलेले सीन असे काही केले आहेत की काही सीन अमर झाले आहेत असे म्हटले तरी हरकत नाही. पावसातील हे सीन प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी झाले आहेत. असे अनेक सीन सांगता येतील.

१) काला-  २०१८ साली आलेल्या काला सिनेमामध्ये रजनीकांत यांनी कमालची अॅक्टींग केली आहे. या सिनेमात रजनीकांतचा एक फाईट सीन आहे. हा सीन मरीन ड्रईववर शुट करण्यात आला आहे. अंधारी रात्र, गडगडणारे ढग आणि मुसळधार पाऊस असा हा सीन एकदम छान शुट झाला आहे. प्रेक्षकांनी या सीनला खूप दाद दिली आहे.

image.png

 

२) कागज के फूल- फिल्म मेकर गुरुदत्तने १८८९ मध्ये कागज के फूल हा सिनेमा बनवला होता. या सिनेमाचाही एक सीन पावसात शुट करण्यात आला आहे. या सीनमध्ये गुरुदत्त झाडाखाली वहीदा रहमानला पहात असतात ज्या पावसता थंडीने कुडकुडत आहेत. गुरुदत्त त्यांच्या जवळ जाऊन म्हणतात की, तुम्ही तुमचा गरम कोट का नाही आणला. त्यावर वहीदा म्हणतात, थंडी मोफत मिळते, गरम कोटला पैसे लागतात.

image.png

३) दिल से- मणिरत्नम यांच्या दिल से या सिनेमात शाहरुख खान आणि मनिषा कोयराला यांनी जबरदस्त अॅक्टींग केली आहे. या सिनेमातही एक सीन पावसात शुट करण्यात आला आहे. या सिनेमात शाहरुख सिगारेट पेटवण्यासाठी लायटर शोधत असतो. तेव्हाच त्याला जाणवतं की, त्याच्या बाजूला कोणीतरी उभं आहे. हवेने मनीषा कोयरालाचे केस उडतात आणि शाहरुखला मनिषाचा चेहरा दिसतो. यावेळी शाहरुख मनीषाला पाहताच तिच्या प्रेमात पडतो.

image.png

४) मशाल – यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या मशाल या सिनेमात दिलीप कुमार यांनी जर्नलिस्टचा रोल केला आहे. दिलीप कुमार मुंबईतील पावसात आपला घर आणि ऑफिस दोन्हीही गमावतात. या सिनेमातील पावसाच्या सीनमध्ये दिलीप कुमार आणि वहीदा रहमान सोबत चालताना दिसत आहेत. वहीदा यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नीचा रोल केला आहे.

image.png

५) गाइड –  १९६५ मध्ये आलेला गाइड हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमात देव आनंद आणि वहीदा रहमान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. देव आनंद या सिनेमात गाइड बनले आहेत. सिनेमातील एका सीनमध्ये गावातील लोक पावसासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. तेव्हाच पावसाला सुरुवात होते. वहीदा धावतात आणि राजू गाइड म्हणजे देव आनंद यांना आवाज देतात. देव आनंद त्यांना जुन्या मंदिराशेजारी भिजलेल्या अवस्थेत दिसतात.

image.png

६) अर्जुन-  या सिनेमात एक मर्डर सीन आहे जो पावसात शुट केला आहे. हा सीन अनेक काळ्या छतांचा वापर करत शुट करण्यात आला आहे. या सीनमध्ये एक व्यक्ती आहे ज्याचा चेहरा दिसत नाही. फक्त तलवारी चालताना या सीनमध्ये दिसत आहे.

image.png

 

७) कुछ कुछ होता है – १९९८ साली आलेल्या या सिनेमाला कोणीच विसरु शकणार नाही. या सिनेमातील एका सीनमध्ये अंजली म्हणजेच काजोलच्या लक्षात येते की, शाहरुख म्हणजेच राज, टीना म्हणजेच रानी मुखर्जीवर प्रेम करत आहे. तेव्हा ती रडताना म्हणते की, “माझं पहिलं प्रेम अधुरं राहिलं इफतबी.”  या सीनमध्ये  जोरदार पाऊस पडताना दिसतो.

image.png

 

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब, दलित मतदार आकर्षित होणार?