Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या भीतीनं ‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट टाळली !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कॅटरीना कैफ स्टारर सूर्यवंशी या सिनेमाची रिलीज डेट पुढील माहिती मिळेपर्यंत टाळण्यात आली आहे. कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून बॉलिवूड इंडस्ट्रीही आता सतर्क झाली आहे.

अक्षय कुमारनं ट्विटरवरून सिनेमाच्या रिलीज डेट बद्दल सांगितलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षय म्हणतो, “सुरक्षा सर्वात आधी आहे. त्यामुळं स्वत:ची काळजी घ्या. सुरक्षित रहा.”

एक नोट शेअर करत अक्षय म्हणतो, “सूर्यवंशी सिनेमा आम्ही मोठ्या मेहनतीनं तयार केला होता. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता निर्माता म्हणून आम्ही या सिनेमाची रिलीज डेट टाळण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आमच्यासाठी प्रिय प्रेक्षकांची सुरक्षा आणि आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. यासाठी सूर्यवंशीची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. योग्य वेळ आल्यानंतर सिनेमा रिलीज केला जाईल. आपण सर्वांनी कोरोनाशी लढलं पाहिजे. आपली सुरक्षा महत्त्वाची आहे. सुरिक्षत रहा. काळजी घ्या. टीम सूर्यवंशी.”

अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ लिड रोलमध्ये असलेला सूर्यवंशी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं ही रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात सिंबामधील रणवीर सिंग आणि सिंघम सिनेमातील अजय देवगण हेदेखील एन्ट्री मारताना दिसणार आहेत. करण जोहरनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ ही जोडी तब्बल 9 वर्षांनंतर पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.