‘स्पेशल २६’ मुंबईत ‘रिपीट’, १३ तोतया ‘आयकर’ अधिकारी ‘गजाआड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये ‘स्पेशल २६’ या चित्रपटात आयकर अधिकारी असल्याचे सांगून लोकांना लुटण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील अधिका-यांप्रमाणेच १३ जणांनी आयकर अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापा-याच्या घरातून रोकड आणि महागडे मोबाईल असा एकूण ८० लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. दहिसर पोलिसांनी १३ जणांच्या टोळीला अटक केली आहे. ही घटना दहिसर परिसरातील वृंदावन सोसायटीत ८ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती.

पोलीस उपायुक्त झोन-१२ डॉ. विनय राठोड यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी १० जण किसन बेलवटे यांच्या घरी आले. त्यांनी स्वत:ला आयकर अधिकारी असल्याचे घरातील लोकांना सांगितले. तुम्ही घरात भरपूर पैसे बेकायदेशीरपणे लपवून ठेवले आहेत. जप्तीसाठी ते पैसे बाहेर काढा आणि करावाईसाठी तयार व्हा असे सांगितले. तसेच आरोपींनी त्यांना खोटे ओळखपत्र दाखवले. किसन बेलवटे यांना आयकर विभागाची कागदपत्रे दाखवून त्यावर त्यांची सही घेतली. त्यानंतर आरोपींनी घरातील ८० लाख रुपये आणि महागडे मोबाईल घेऊन गेले. दरम्यान, घरातील लोकांना त्यांच्यावर संशय आल्याने तात्काळ दहिसर पोलिसांना याची माहिती दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरु केला. दरम्यान, घटनास्थळी एका रिक्षा चालकाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने या टोळीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी समीर केतकर, प्रभाकर पालांडे, संतोष दुबे, अल्ताफ, बबिता चव्हाण, कुमुदनी आणि शैलेश यांच्यासह इतरांना अटक केली. समीर काबदी हा टोळीचा मोरक्या असल्याचे आरोपींनी सांगितले. पकडण्यात आलेले आरोपी परिसरातील खासगी कंपनीत काम करत होते.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, एपीआय जीतेंद्र कदम, गोरखनाथ घार्गे, उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे, श्रीकांत मगर, शिवाजी चोरे, संदीप शेवाळे यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त – 

वीस वयानंतर मुलींच्या शरीरात होतात ‘हे’ बदल

‘हे’ शक्य आहे, योग्स आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम