‘कन्हैया’च्या देशद्रोहाच्या खटल्यास मंजुरी दिल्याने ‘अनुराग कश्यप’ संतापले, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आप ची विशेषत: अरंविद केजरीवाल यांची भूमिका पूर्णपणे बदललेली दिसत आहे. हिंदुंच्या अस्मितांना धक्का लागणार नाही आणि राष्ट्रवादाच्या विरोधात कोणतीही गोष्ट आपल्या हातून होणार नाही, याची अधिक काळजी घेऊ लागले आहेत. त्यातूनच त्यांनी कन्हैय्या कुमार व इतरांविरोधातील देशद्रोहाचा खटला चालविण्यास दिल्ली पोलिसांना परवानगी दिली आहे.

Anurag Kashyap, kanhaiya kumar, arvind kejriwal, anurag kashyap twitter, anurag kashyap on arvind kejriwal, anurag kashyap tweet, अनुराग कश्यप, अरविंद केजरीवाल, दिल्ली सरकार, देशद्रोह, कन्हैया कुमार

अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेऊन डाव्या विचारसरणीच्या सर्वांना एक मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एक ट्विट करुन केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्ली सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कन्हैयाकुमार याने ट्विट केले होते की, महाशय अरविंद केजरीवाल जी, आपल्याला काय म्हणणार. दिल्ली सरकारद्वारा देशद्रोह खटल्याला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. पोलीस आणि सरकारी वकिलांना आग्रह आहे की ही केस आता गंभीरपणे घ्या. फॉस्ट ट्रॅक कोर्टात तातडीने सुनावणी सुरु व्हावी. टीव्हीवरील आपकी अदालत ऐवजी कायद्याच्या न्यायालयात न्याय निश्चित व्हावा. सत्यमेत जयते.

कन्हैयाकुमार याचे ट्विट रिट्विट करुन अनुराग कश्यप त्यांनी म्हटले आहे की, महाशय, आपल्याला काय म्हणणार, कणा नसणे ही प्रशंसा आहे. आपण तर तसे नाहीत. कितीला विकले गेलात?. अनुराग कश्यपच्या या ट्विटवर लोक आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. त्याला विरोधही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.