‘त्यांना शारीरिक तडजोड हवी होती, मला विकण्याचा किंवा खरेदी करण्याचाही प्रयत्न झाला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. बॉलिवूडमधील पॉलिटीक्स आणि गटबाजीवरूनही बोललं जात आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. आता पर्यंत अनेक कलाकारांनी नेपोटीजम आणि गटबाजीवरील त्यांचं मत मांडलं आहे. आता बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची स्पर्धक सोफिया हयात हिनंही यावर प्रतिक्रिया देत तिला आलेला अनुभव सांगितला आहे.

‘त्यांना शारीरिक तडजोड हवी होती’

एका मुलाखतीत बोलताना सोफिया म्हणाली, “फिल्म इंडस्ट्रीत नेपोटीजम दीर्घकाळापासून आहे. परदेशी असल्यानं मला त्रास सहन करावा लागला आहे. बॉलिवूडमधील अनेक बड्या मेकर्सनं मला कामासाठी आमंत्रण दिलं. डायरी ऑफ बटरफ्लाय या सिनेमात मला कास्ट करण्यात आलं होतं. नंतर बडया स्टार्स आणि फिल्म मेकर्सनं माझ्यावर चान्स मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना शारीरिक तडजोड हवी होती. मी कधी त्यांच्या हाती सापडले नाही. सतत मला अप्रोच केलं जात होतं पंरतु कामाच्या तासांव्यतिरीक्त मी कधीच त्यांना भेटले नाही.”

‘मला विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा प्रयत्न झाला’

सोफिया म्हणाली, “त्यांचं न ऐकल्यानं मला मिळणारं काम इतर मुलींना दिलं जाऊ लागलं. सिनेमातून माझे सीन्स कापले जाऊ लागले. यानंतर मी माझ्या देशात परतण्याचा निर्णय घेतला. मला नेपोटीजमची शिकार नव्हतं व्हायचं.”

सोफियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोफियाचा जन्म 6 डिसेंबर 1984 मध्ये लंडनमध्ये झाला होता. 2002 मध्ये सोफियाने सिनेमाजगतात पाऊल टाकलं होतं. हॉलिवूड सिनेमांव्यतिरीक्त सोफिया हिंदी सिनेमांमध्येही दिसली आहे. भारतात ती बिग बॉस 7 मध्ये आल्यानंतर खूप फेमस झाली. यानंतर तिनं काही सिनेमातही काम केलं आहे. सोफियानं बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डमधून एन्ट्री केली होती.