मधुर भांडारकर घेऊन येताहेत ‘इंडिया लॉकडाऊन’ ! अद्याप ‘कोरोना’वर बनवलेत ‘हे’ Movies And Web Series

पोलिसनामा ऑनलाईन – भारतात 25 मार्च 2020 रोजी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यावेळी देशात सर्व गोष्टी ठप्प झाल्या होत्या. अनेक लोक दुसऱ्या शहरांमध्ये अडकले होते. या महामारीमुळं खूप काही बदलून गेलं. यावर अनेक सिनेमे आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या आहेत. आता फिल्ममेकर मधुर भांडारकर इंडिया लॉकडाऊन नावानं एक नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. या वीकेंडला तुम्ही कोरोनावर बनलेले हे सिनेमे आणि सीरिज पाहू शकता.

1) इंडिया लॉकडाऊन – मधुर भांडारकर यांनी सिनेमाचं पोस्टर शेअर करत याची घोषणा केली आहे. प्रतिक बब्बर सिनेमात लिड रोलमध्ये दिसणार आहे. खऱ्या घटनांवर आधारीत हा सिनेमा एक सोशल ड्रामा असेल. प्रतिक सोबत या सिनेमात श्वेता बसु प्रसाद, अहाना कुमरा आणि प्रकाश बेलावडी हे देखील दिसणार आहेत.

2) द गॉन गेम – ही सीरिज वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. ही एक इंटरेस्टींग सीरिज आहे. सर्व अॅक्टर्सनी आपल्या हिश्याची स्टोरी आपापल्या घरात शुट केली आहे. डायरेक्टर निखिल नागेस भट यांनी ही सीरिज तयार केली आहे.

3) अनपॉज्ड – 18 डिसेंबर 2020 रोजी अॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. यात 4 स्टोरीज दाखवण्यात आल्या आहेत. हे पाहून तुम्हाला कोरोना काळातील अनेक अडचणी आठवतील.

4) आउटसाईड इन – 16 डिसेंबर 2020 रोजी अभिनेता वीरदासचा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा चाहत्यांनाही खूप आवडला आहे.