Fabulous Lives of Bollywood Wives व्यतिरीक्त ‘हे’ सिनेमेही दाखवतात पडद्यामागील कहाणी ! पहा ट्रेलर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेटफ्लिक्स (Netflix) वरील शो Fabulous Lives of Bollywood Wives सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांचा हा शो आहे. या रिॲलिटी शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि ॲक्ट्रेस नीलम कोठारी सोनी दिसणार आहेत. फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिॲलिटी शोमध्ये स्टार्सच्या वाईफ कशी लाईफ जगतात हे दाखवण्यात आलं आहे. यात अनेक बडे चेहरे हे पाहुणे कलाकार म्हणून दिसत आहे. 27 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो रिलीज झाला आहे. पडद्यामागील कहाणी फक्त याच शोमध्ये नाही तर बॉलिवूडमधील अनेक सिनेमात दाखवली गेली आहे. अशाच काही सिनेमांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) रंगीला – 1995 साली आलेला उर्मिला मातोंडकर, जॅकी श्रॉफ आणि आमिर खान स्टारर रंगीला सिनेमात बॉलिवूडशी संबंधित प्रवास दाखवण्यात आला आहे. यात उर्मिला बॅकग्राऊंड डान्सरच्या भूमिकेत असते जी नंतर इंडस्ट्रीतील लिड ॲक्ट्रेस बनते. यानंत तिच्या आयुष्यातील चढऊतार दाखवण्यात आले आहेत.ॲमेझॉन प्राईमवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.

2) हिरोईन – मधुर भांडारकर चा 2012 साली आलेला करीना कपूर स्टारर हिरोईन सिनेमाही असाच आहे. करीना यात इंडस्ट्रीतील प्रसिद्ध ॲक्ट्रेस दाखवली आहे जिला स्टारडमसाठी मोठी किंमत मोजावी लागते. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.

3) द डर्टी पिक्चर – साऊथ सिनेमातील अशी ॲक्ट्रेस जिनं स्वत:च्याच दमावर सिनेमाची नौका पार नेली. तिचं नाव आहे विजयलक्ष्मी. जिला सिल्क स्मिता नाव मिळालं होतं. सिल्क स्मिताचं बायोपिक असणारा हा सिनेमा आहे. युट्युबवर हा सिनेमा पाहू शकता.

4) पेज 3 – मधुर भांडारकर चा आणखी एक सिनेमा पेज थ्री एक सेलिब्रिटी जर्नलिस्टच्या नजरेतून फिल्म उद्योागची कल्पना आहे. एक पत्रकार अभिनेता, निर्माते आणि व्यावसायिकांच्या खासगी आयुष्याला कोणत्या नजरेतून पाहतो. ॲमेझॉन प्राईमवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.

 

You might also like