‘या’ अभिनेत्रीचा बडा निर्माता असणाऱ्या प्रियकराने केला ‘असा’ छळ की तिला जीव वाचवून पळावं लागलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री सिनेमातील भूताचा रोल करणाऱ्या अभिनेत्री फ्लोराने आपल्या सोबतच्या घरगुती हिंसेबाबत खुलासा केला आहे. तिने हे सर्व २००६-०७ ला सहन केलं आहे. त्यावेळी फ्लोरा प्रोड्युसर गौरांग दोशीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होती. फ्लोरा म्हणते की, “मी त्याचं(दोशी) घर सोडलं तेव्हा मी खूपच खराब अवस्थेत होते. माझ्या तोंडाला जबरदस्त इजा झाली होती. मला केवळ माझा जीव वाचवायचा होता. तेव्हाच मी ठरवलं होतं की, मी त्याला कोर्टात खेचणार. त्याने माझा जो शारीरिक आणि मानसिक छळ केला त्याची शिक्षा मी त्याला नक्कीच देईन.

गौरांग तिला कशा प्रकारे धमकावत असे हे सांगताना फ्लोरा म्हणते की, “तो मला धमकी द्यायचा की, मी प्रोड्युसर आहे. तू आता कोर्टात जात आहेस तर खुशाल जा. मी पण काळजी घेईन की तुला कोठे काम मिळणार नाही. सुरुवातीला मला मिळणारी कामं बंद झाली होती. कारण मी गौरंगविरोधात तक्रार दाखल केली होती. तो जे म्हटला होता तेच माझ्यासोबत घडत होतं. परंतु मीदेखील काही चुकीचं केलं नव्हतं. माझ्यासोबत जे झालं ते खूपच चुकीचं होतं. मी देवाच्या कृपाने सर्व सुरळीत केलं. नंतर मला काही प्रोजेक्ट्सही मिळाले. त्यानंतर स्त्री हा सिनेमा मला मिळाला. हा सिनेमा माझ्यासाठी गेमचेंजर ठरला.”

पुढे फ्लोरा म्हणते की, “माझे काही मित्र म्हटलेदेखील होते की, तू दुसरा कुठला रोल का नाही निवडला. किमान तुझा चेहरा तरी दिसला असता. परंतु यामुळे काही फरक पडत नाही. मी १०० कोटी कमावणाऱ्या सिनेमाचा हिस्सा बनले. जे माझ्या एक्सने म्हटले होते की, मी कधीच करू शकत नाही. आता लोक मला माझ्या नावाने ओळखतात. मी असा कधी विचारही केला नव्हता.”

फ्लोराने सांगितले की, आता ती न्यायासाठी लढा देत आहे. #MeToo चळवळीने तर बरंच काही बदललं आहे. ती म्हणते की, जे सॉरी मला त्या माणसाकडून नाही मिळालं ते मला अनेक दुसऱ्या लोकांपासून मिळालं ज्यांना माझ्यासोबत जे झालं ते ऐकून दु:ख झालं.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

 

Loading...
You might also like