फसवणूक प्रकरणात अभिनेत्री अमिषा पटेलला अटक होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’ चे प्रोड्यूसर अजय सिंहला अडीच कोटीचा चूना लावणे अभिनेत्री अमिषा पटेलला महागात पडले आहे. ८ जुलैला रांची कोर्टने अमीषा पटेलला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला होता. पण कायद्यानूसार अमिषा तिथे पोहचली नाही आणि तिचा बिजनेस पार्टनर कुणाल गुमरही पोहचला नाही.

‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ चित्रपटाचा निर्माता अजय कुमारसिंह यांचे वकील गोपाल कृष्ण सिन्हा यांनी दोघांच्या विरोधात न्यायालयात गैर जमानती वारंट दाखल करण्याची विनंती केली आहे. लवकरच रांची पोलीस अमिषा पटेला अटक करु शकतात.

मागच्या वर्षी जेव्हा अभिनेत्री अमीषा पटेलने चित्रपट ‘देसी मॅजिक’ साठी अडीच कोटी रुपये उधार घेतले होते. पण ती मागच्या वर्षीपासून पैसे परत करण्यासाठी कोणतीच प्रतिक्रिया देत नाही. यामुळे ‘फैमिली ऑफ ठाकुरगंज’ चे प्रोड्यूसर अजय कुमार सिंह यांनी रांचीच्या न्यायालयात धाव घेतली.

अजय सिंह म्हणाले, अभिनेत्री अमिषा पटेलचा ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट जून २०१९ मध्ये प्रदर्शित होणार होता. नंतर हा चित्रपट सप्टेंबरमध्ये गेला. मला ३ करोडचा चेक दिला होता, पण तो चेक बाउंस झाला. जेव्हा मी तिला फॉलो करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचे वागणे बदल्यासारखे दिसले. मी तिला म्हणालो की, मी एक छोटा गुंतवणूकदार आहे आणि मी गप्प राहणार नाही कारण ते माझे पैसे आहे. ते मी व्याजासहित परत घेईन.

अजय कुमार सिंह यांचा ‘फैमिली ऑफ ठाकुरगंज’ चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जिम्मी शेरगिल, माही गिल, नंदिश संधू, सौरभ शुक्ला, सुप्रिया पिळगांवकर, मनोज पाहवा आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा दिलीप शुक्ला यांनी लिहली आहे. हा चित्रपटाला मनोज झा यांनी डायरेक्ट केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय