Video : कुली नंबर 1 ते दुर्गामतीपर्यंत ! डिसेंबरमध्ये रिलीज होताहेत ‘हे’ 4 सिनेमे ! घरबसल्या होणार Entertainment

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये 4 नवीन सिनेमे रिलीज होणार आहेत. इंदू की जवानी हा सिनेमा सोडला तर इतर सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. अलीकडेच घोषणा झाली की, इंदू की जवानी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आज आपण काही नवीन रिलीज होणाऱ्या सिनेमांची माहिती घेणार आहोत जे तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

1) कुली नंबर 1 – बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 (Coolie No. 1) मुळं चर्चेत आहेत. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. शनिवारी (दि 28 नोव्हेंबर) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

2) तोरबाज – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) यानं अलीकडेच कर्करोगावर मात केली आहे. यानंतर तो पुन्हा एकदा कामाला लागला आहे. गेल्या 28 ऑक्टोबर रोजी त्यानं सडक 2 सिनेमातून धमाल केली. यानंतर पुन्हा एकदा तो धमाकेदार वापसीसाठी तयार आहे. संजय दत्तचा आगामी सिनेमा तोरबाज (Torbaaz) चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तोरबाज हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज होणार आहे.

3) दुर्गामती – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिच्या दुर्गमती : द मिथ (Durgamati : The Myth) या आगामी सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) नं अलीकडेच सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय या सिनेमाचा प्रोड्युसर देखील आहे. अक्षय आता या सिनेमातून धमाल करण्यासाठी तयार आहे. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियावर रिलीज होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनामुळं हा सिनेमा थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

4) इंदू की जवानी – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. लक्ष्मीनंतर आता कियाराचा आणखी एक सिनेमा रिलीज होत आहे. कियाराचा इंदू की जवानी हा सिनेमा पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. कियारा देखील तिच्या सिनेमाला घेऊन खूप एक्साईटेड आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कारण आता कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर हळूहळू थिएटर्स सुरू होत आहेत. बॉलिवूडमधील ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यानंही ट्विट करत सिनेमाच्या रिलीज बद्दल सांगितलं होतं.

You might also like