Gauahar Khan Wedding : ‘इथं’ होणार ‘गौहर-जैद’चं ग्रँड वेडिंग ! फोटोशूटचा ‘हा’ खास प्लॅन

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) अलीकडेच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सीनियर म्हणून दिसली होती. सध्या ती तिच्या खासगी लाइफमुळं चर्चेत आली आहे. गौहर खाननं म्युझिक कंपोजर इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा जैद दरबार (Zaid Darbar) सोबत आपलं नातं पब्लिक केलं आहे. लवकरच ती जैदसोबत लग्न करणार आहे. अलीकडे गौहरनं तिच्या एंगेजमेंट रिगंचा फोटो सोशलवर शेअर केला आहे. पुढील महिन्यात 25 डिसेंबर रोजी गौहर लग्न करणार आहे. तिनं लग्नाच्या तयारीलादेखील सुरुवात केली आहे. आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगण्यासोबतच अ‍ॅक्ट्रेस आपल्या फोटोंसाठी चर्चेत आहे.

गौहर आणि जैद यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. सध्या दोघंही मुंबईत फिरायला गेले आहेत. दोघांचेही मस्ती करतानाचे आणि क्वालिटी टाईम स्पेंड करतानाचे फोटो समोर आले होते. आता लग्नाबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, गौहर आणि जैद मुंबईतील ग्रँड आयटीसी मराठामध्ये निकाह करणार आहेत. इतकंच नाही तर प्री वेडिंग शूट आणि इतर इव्हेंटसाठीही तयारी सुरू करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कपलनं लग्नासाठी आयटीसी मराठाची निवड केली आहे. याशिवाय ते पुण्यातील जाधवगड हॉटेलात प्रीवेडींग शुटही करू शकतात. गौहरला तिच्या लग्नला रॉयल टच द्यायचा आहे. 25 ला लग्न आहे परंतु 22 डिसेंबर पासून लग्नाचे प्रीवेडींग फंक्शन्स सुरू होणार आहेत. यानंतर 25 तारखेला निकाह आहे.

You might also like