गौहर खान प्रेग्नंसीच्या चर्चेनं झाली नाराज, म्हणाली – ’तुमचं डोकं खराब आहे आणि फॅक्ट्स सुद्धा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) सध्या खुप वाईट काळातून वाटचाल करत आहे. नुकतेच तिच्या वडीलांचे निधन झाले, त्यांनी मागील 5 मार्चला अखेरचा श्वास घेतला. यामुळे ती सध्या खुप अस्वस्थ आहे. गौहरने सोशल मीडियावर आपल्या वडीलांचा फोटो शेयर करत त्यांना श्रद्धांजली दिली होती. या दरम्यान बातम्या येऊ लागल्या की, विवाहाच्या तीन महिन्यांच्या आतच गौहर प्रेग्नंट आहे. गौहरने डिसेंबर 2020मध्येच जैद दरबार सोबत विवाह केला होता. आपल्या प्रेग्नंसीच्या बातम्यांवर गौहर खानने राग व्यक्त केला आहे.
Gauhar Khan, gauahar khan pregnant

तिने सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसीचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. नुकताच एका न्यूज पोर्टलने अभिनेत्री गौहर गरोदर असल्याचा दावा केला होता. पोर्टलच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना गौहर खानने (Gauahar Khan) आता एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये तिने या वृत्तासाठी पोर्टलला चांगलेच सुनावले आहे.

गौहरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमचं डोकं खराब आहे आणि फॅक्ट्स सुद्धा. 12 वर्षापेक्षा लहान असल्याचे वृत्त झाले जुने, तेव्हा बातम्या लिहिताना अगोदर आपल्या फॅक्ट चेक करत चला. मी नुकतेच माझे वडील गमावले, तेव्हा आपल्या निराधार रिपोर्टबाबत काही तरी संवेदनशीलता राखा. मी प्रेग्नंट नाही, तुमचे खुप-खुप आभार.

गौहर खानचा (Gauahar Khan) पती जैद दरबार ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, – ’कन्फर्म आहे, आमच्या सोबत एक नवा सदस्य आला आहे. यावरून काय वाटते, कोण आहे? कमेंट करून सांगा. जैदच्या या पोस्टवर कमेंट करत बहुतांश यूजर्सने गौहर खान प्रेग्नंट असल्याचा अंदाज वर्तवला होता.