गौहर खाननं दुबईतील फेमस इमारतीसमोर दिल्या ‘अशा’ पोज ! ‘हा’ प्रश्न विचारून चाहत्यांना केलं कन्फ्युज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) अलीकडेच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सीनियर म्हणून दिसली होती. सध्या ती तिच्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली आहे. गौहर खाननं म्युझिक कंपोजर इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा जैद दरबार (Zaid Darbar) सोबत आपलं नातं पब्लिक केलं आहे. लवकरच ती जैद सोबत लग्न करणार आहे. अलीकडेट गौहरनं तिच्या एंगेजमेंट रिगंचा फोटो सोशलवर शेअर केला होता. पुढील महिन्यात 25 डिसेंबर रोजी गौहर लग्न करणार आहे. तिनं लग्नाच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच गौहर जैद आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत दुबईला गेली होती.

गौहरनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती दुबई व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, गौहर आणि जैद एकमेकांसोबत खूप मस्ती करत आहेत.

गौहरनं शेअर केलेल्या एका फोटोत दिसत आहे की, गौहर दुबईतील फेमस उंच इमारतीसमोर उभी राहून पोज देत आहे. सोबत तिनं चाहत्यांना एक प्रश्न विचारत कंफ्यजु केलं आहे. गौहरनं विचारलं आहे की, ही बुर्ज खलिफा आहे की, बुर्ज अल अरब.

गौहरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी गौहरच्या फोटोंवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.