‘किंग’ शाहरुखच्या समुद्रातील व्हिडीओची सोशलवर ‘चर्चा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या आपल्या फॅमिलिसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. गौरी खान मुलगी सुहाना, अबराम आणि आर्यन सुट्टीचा चांगलाच आनंद घेत आहेत. गौरीने नुकतेच सुट्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. गौरीने शेअर केलेल्या फोटोत आर्यन, सुहाना आणि अबराम तिघेही दिसत आहेत. फोटो शेअर करताना गौरीने खास कॅप्नशनही दिले आहे. कॅप्शनमध्ये गौरी म्हणते की, “माय थ्री लिटिल…” तिघेही फोटोत खूप सुंदर दिसत आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी किंग शाहरुख आपली मुलं सुहाना, आर्यन आणि अबरामसोबत मालदीव्समध्ये होता. काही दिवसांपूर्वीही त्याचे काही फोटो समोर आले होते. शाहरुखने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याची सुट्टी एन्जॉय करतानाची एक झलक पाहायला मिळते. शाहरुखचा हा व्हिडीओ मालदीव सोडतानाचा आहे. शाहरुखने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमधून ते लक्षात येतं. कॅप्शनमध्ये शाहरुख म्हणतो की, “Feeling bad having to leave Maldives and especially all the wonderful people at #JumeirahVittaveli. Thank u for a lovely holiday @jumeirahvittaveli will miss u all. @makeplansholidays.”

शाहरुख खानचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत कौतुक केले आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, काही तासांतच या व्हिडीओला 2 मिलियन्सहून अधिक व्ह्युज मिळाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –