‘तरुणांना ड्रग्सपेक्षा जास्त पोर्न पाहण्याची सवय’, अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या पतीचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती फिल्म मेकर गोल्डी बहलने नुकतेच तरुण जनरेशन आणि त्याच्या सवयीला घेऊन चर्चा केली आहे. ‘RejctX’ नावाची वेब सीरीजमधून डिजिटलमध्ये पदार्पण केलेल्या चित्रपट निर्माता गोल्डी यांनी सांगितले की, आजकाल तरुण मुलांना ड्रग्सपेक्षा सोशल मिडियावर पॉर्न पाहण्याची खूप सवय लागली आहे. कारण वर्चुअल दुनियेने त्यांच्या मनात घर केले आहे. आजकाल मुले अशा गोष्टींचा सामना करत आहे जे खूप गंभीर आहे. आजकाल इंटरनेट त्यांच्या जीवनातील एक हिस्सा बनला आहे.

त्यांनी सांगितले ती, आजकाल मुले सेक्शुअल ओरिएंटेशनसारख्या गोष्टी ऐकून परिक्षक होत नाही. त्याविषयी सारखे ऐकून किंवा पाहून त्यांना ड्रगपेक्षा जास्त सोशल मिडियावर पोर्नची सवय लागते.

गोल्डी यांनी सांगितले की, आपल्या वेब सीरीजमध्ये मी कोणतेच लेक्चर देत नाही. हे रिअल लाइफ आहे. माझा मुलगा १४ वर्षाचा होईल, मी त्याच्या जीवनाला पुर्ण समजू शकतो. ‘RejctX’ एक म्यूजिकल थ्रिलर आहे. याची कथा सिंगापूरमधील इंटरनॅशनल कॉलेज कॅम्पसमधील सात मुलांची आहे.

दहा एपिसोडची ही सीरिज ‘zee5’ वर सुरु होणार आहे. या सीरीजमध्ये कुब्रा सैत, सुमीत व्यास, मासी वली, अनीशा विक्टर, आयूष खुराना, प्रभनीत सिंह. रिद्धी खाखर, साधिका स्याल आणि पूजा शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. गोल्डी बहलने यांनी सांगितले की, वेब सीरीजची कथांमध्ये तरुणांबद्दल चर्चा होत आहे. यासाठी कास्टला घेऊन खास लक्ष ठेवले आहे जेणेकरुन लोक भूमिकेमध्ये स्वतःला बाहून ही सीरीज बघतील.