‘खिलाडी’ अक्षय पुन्हा बनला बॉलिवूडमधील सर्वात ‘श्रीमंत’ सेलेब्रिटी ! जाणून घ्या ‘सलमान’, ‘शाहरुख’ आणि ‘दीपिका’ची कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोर्ब्सनं 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला दुसरे स्थान मिळाले आहे. अक्षयसाठी 2019 खूपच शानदार गेलं आहे. IANSच्या वृत्तानुसार, 2019 मध्ये अक्षय कुमारची एकूण कमाई 293.25 कोटी आहे जी मागील वर्षाच्या तुलनेत 58.51 टक्के अधिक आहे. लवकरच अक्षय गुड न्यूज सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूडचा दबंग स्टार फोर्ब्स 2019 च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलमानची एकूण कमाई 229.35 कोटी आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं सलमान खानला मागे टाकत केलं 252.75 कोटींची कमाई या वर्षात केली आहे. गेल्या वर्षी सलमान खान या यादीत टॉपवर होता. लवकरच सलमान दबंग 3 सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान 124.38 कोटींची कमाई करत टॉपमध्ये पोहोचला आहे. शाहरुखचा या वर्षात सिनेमात तर नाही आला परंतु प्रॉडक्शन आणि जाहिरातींच्या माध्यमातून त्यानं आपलं उत्पन्न कायम ठेवलं आहे. अभिनेत्री आलिया भट या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. लवकरच ती ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत टॉप 10 मध्ये दोन अभिनेत्री असण्याची ही पहिलीच वेळ आहे. दीपिका लवकरच छपाक या सिनेमात दिसणार आहे.

द 2019 फोर्ब्स इंडिया सेलेब्रिटी 100 ची यादी सेलेब्रिटींची प्रसिद्धी आणि विविध स्रोतांमधून होणारी त्यांची कमाई याच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. हे उत्पन्न 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यानचं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/