…म्हणून गोविंदा डेविड धवनवर ‘भडकला’ ; वरूण धवनबाबत केलं मोठं ‘वक्तव्य’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा सध्या चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे त्यानी केलेले वक्तव्य. एका जमान्यातील त्याचा मित्र असणाऱ्या डेविड धवनला घेऊन गोविंदाने असे काही म्हटले आहे की, त्याचे चाहतेही चकित झाले आहेत. गोविंदाने आपल्या स्टेटमेंटमध्ये डेविडचा मुलगा वरुण धवनचंही नाव घेतलं आहे. याशिवाय त्याने आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.

image.png

एकेकाळी गोविंदा आणि डेविड धवनची जोडी खूप प्रसिद्ध होती. या दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमात सोबत काम केले आहे. दोघांनी सोबत काम केलेले अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. अचानक असे काही झाले की, दोघांमध्ये खटके उडाले. यानंतर या जोडीने सोबत काम करणे बंद केले.

image.png

डेविड धवनसोबत केले 17 सिनेमे
गोविंदाला एका मुलाखतीत जेव्हा दोघांच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो नाराज होत म्हणाला की, “डेविड धवन मला हा प्रश्न तेव्हा विचारू शकतो जेव्हा तो आपला मुलगा वरुण धवन सोबत १७ सिनेमे करेल. मला नाही वाटत की, त्याचा मुलगा त्याच्यासोबत कधी १७ सिनेमे करेल कारण तो डेविड धवनचा मुलगा आहे. तो शिकलेला आहे. मला हे नाही समजलं की, एका डायरेक्टर सोबत १७ सिनेमे करणे काय असतं. मी माझ्या भावा सोबत १७ सिनेमे नाही केले जो एक डायरेक्टर आहे.”

image.png

‘मी डेविडची एवढी इज्जत करायचो जेवढी’
गोविंद पुढे म्हणाला की, “मी संजय दत्तच्या म्हणण्यावरून डेविड धवनला काम दिलं होतं. मला डेविड आवडला होता. मी त्याच्यासोबत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मी त्याची एवढी इज्जत करायचो जेवढी मी माझ्या नातेवाईकांचीही करत नसेल.

‘तेव्हा मी ठरवलं की, डेविडसोबत काम करायचं नाही’
गोविंदा म्हणाला की, “मी माझ्या सेक्रेटरीद्वारे डेविडला कॉल केला आणि फोन स्पीकरवर ठेवून त्याचं बोलणं ऐकलं. डेविड माझ्या सेक्रेटरीला म्हणाला की, “मला गोविंदासोबत आता आणखी काम करायचे नाही. त्याला सांग की, छोटे मोठे रोल कर. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यावेळी मी ठरवलं की, मी त्याच्यासोबत काम करणार नाही. मला नाही वाटत की, हा तो डेविड आहे ज्याला मी ओळखतो.”

आरोग्यविषयक वृत्त