Video : ‘या’ अभिनेत्रीनं चक्क साडी घालून मारले पुशअप्स !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड आणि टीव्ही अ‍ॅक्ट्रेस गुल पनाग (Gul Panag) काही दिवसांपूर्वीच आपल्या बोल्ड बिकिनी लुकमुळं चर्चेत आली होती. तिच्या हॉट अवतारानं तिनं सोशलवर राडा घातला होता. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेचं कारण ठरलं आहे ते म्हणजे तिचा वर्कआउट व्हिडिओ. व्हिडिओत गुल साडी घालून पुशअप्स मारताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशलवर वेगानं व्हायरल होतान दिसत आहे.

गुलनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती जीम वेअर नव्हे तर चक्क साडी घालून पुशअप्स मारताना दिसत आहे. गुलचा हा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना गुलनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिनं व्हिडिओ शेअर करताच सोशलवर प्रचंड व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

गुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती अ‍ॅमेझॉन प्राईमच्या द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये दिसली होती. याशिवाय नुकत्याच अनुष्का शर्मा निर्मित पाताल लोकामध्येही तिनं काम केलं आहे. याशिवाय बायपास रोड या सिनेमातही ती दिसली आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झाला होता. गुलनं जुर्म, डोर, धूप, मनोरमा अशा अनेक सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.

You might also like