आजच रिलीज होणार ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर ! ‘शुजित-बिग बी’सोबत मिळून आयुष्माननं ‘अशी’ केली घोषणा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाऊनमध्ये सारं काही ठप्प झालं आहे. साधा सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला नव्हता. परंतु आता एक आनंदाची बातमी अशी आहे की, दीर्घकाळानंतर आता एका सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता मेकर्सनी हा सिनेमा 12 जून रोजी अॅमेझॉन प्राईमवर ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या ट्रेलरची घोषणा अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना आणि शुजित सरकार यांनी मिळून केली आहे.

ट्रेलर लाँच करण्यापूर्वी मेकर्सनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात शुजित, बिग बी आणि आयुष्मान सिनेमाच्या ट्रेलरची डेट अनाऊंस करत आहेत. हा व्हिडीओ खूप छान आहे. आयुष्माननंही हा व्हिडीओ त्याच्या इंस्टावरून शेअर केला आहे. आयुष्मान म्हणतो कोण किती शातिर आहे हे तुम्ही उद्याच पहा.”

व्हिडीओत दिसत आहे की, आयुष्मान, शुजित आणि बिग बी तिघेही व्हिडीओ कॉलवर आहेत. इथेही बिगी आणि आयुष्मानची नोकझोक पहायला मिळत आहे. आयुष्माननं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना आता ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. आजच ( दि 22 मे) ट्रेलर रिलीज केला जाणार आहे.