Alia Bhatt Birthday : सर्वाधिक ‘कमाई’ करणारी अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनय सोडून इतर स्त्रोत्र मोठे ‘सोर्स’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार आलिया भट हिनं आज आपला वाढदिवस साजरा केला. ताज्या रिपोर्टमधून अशी माहिती समोर आली आहे की, आलिया भट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी ॲक्ट्रेस आहे. आलिया सिनेमांसोबतच इतर मार्गांनीही पैसे कमावते. ती एक चांगली बिजनेसपर्सनही आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या 2019 मधील टॉप 100 सेलिब्रेटींमध्ये आलिया 8 व्या क्रमांकावर आहे. ॲक्ट्रेसपैकी ती पहिल्यां स्थानावर आहे. आलियानं गेल्या वर्षी 59.21 कोटी रुपये कमावले होते. 2018 मध्ये तिची कमाई 58.83 कोटी होती. जाणून घेऊयात आलियाचे आर्थिक सोर्स.

1) सिनेमे – आलियाच्या कमाईचा पहिला स्त्रोत सिनेमा आहे. आलिया तिच्या प्रत्येक सिनेमच्या हिशोबानं फी घेत असते.

2) स्टार्टअप – आलियाचे सिनेमाव्यतिरीक्त अनेक स्टार्टअप्स आहेत. तिनं अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. अलीकडेच तिनं फॅशन टॅक स्टार्टअपमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.

3) युट्युब चॅनल – आलियाचा एक युट्युब चॅनलही आहे. तिचे 1.33 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. तिच्या एका व्हिडीओला 30 ते 50 लाख व्ह्युज असतात. तिची आपल्या चॅनलवरूनही चांगली कमाई होत असते. आलिया फिटनेस, किचनचे व्हिडीओ शेअर करत असते. तिनं अनेक ब्रँडचं प्रमोशनही केलं आहे.

4) ब्रँडचे कॉन्ट्रॅक्ट – आलिया अनेक ब्रँडसोबत जोडली गेली आहे. ब्रँडची जाहिरात करूनही आलिया चांगली कमाई करते. यात लेज, फ्रुटी, उबर इट्स, फ्लिपकार्ट अशा ब्रँडचा समावेश आहे.

5) इंस्टाग्राम – सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी हॉपर्स HQ नं इंस्टाग्राम रिच लिस्ट 2019 जारी केली होती. यात सांगितलं होतं की, एक सेलिब्रिटी आपल्या एका पोस्टसाठी किती कमावतात. यात सांगितलं होतं की, आलिया प्रत्येक इंस्टा पोस्टमधून 1 कोटी कमावते असं यातून समोर आलं होतं.