Birthday SPL : ईशा गुप्ताचे ‘ते’ 10 ‘सुपरहॉट’ फोटो ज्यांनी उडवली सोशलवर खळबळ !

पोलीसनामा ऑनलाइन – ईशा गुप्ता बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. अलीकडेच तिनं तिच्या इंस्टावरून सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते. यानंतर आता तिनं एकच अतिशय बोल्ड फोटो शेअर केला होता, ज्यामुळं ती चर्चेत आली होती. आज ईशा तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

ईशाचा जन्म 28 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीत झाला होता. ईशानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. या फोटोत ईशा प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे. ईशाच्या या फोटोंनी सोशलवर राडा घातला आहे.

ईशाविषयी थोडक्यात…

ईशा गुप्ताला सोशलवर फोटो शेअर करायला खूप आवडतं. ईशा गुप्ता ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे. यानंतरच ईशाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. जन्नत 2 या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ईशाची सोशलवर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, चक्रव्यूह, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. वन डे सिनेमात ती शेवटची दिसली होती.