Birthday SPL : प्रिंस नरुला आणि युविका चौधरी यांची रोमँटिक केमिस्ट्री ! फोटोंमुळं अनेकदा चर्चेत आलंय कपल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   युविका चौधरी (Yuvika chaudhary) आणि प्रिंस नरुला (Prince Narula) टीव्हीच्या बेस्ट कपलपैकी एक आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर अशी माहिती समोर आली होती की, लवकरच हे कपल आईबाबा होणार आहेत. परंतु युविकानं याचा खुलासा करत या अफवा खोट्या असल्याचं सांगितलं होतं. आज प्रिंस नरुला त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रिंस आणि युविका दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते कायमच त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आपल्या फोटोंमुळं केमिस्ट्रीमुळंही अनेकदा ते चर्चेत आले आहेत. युविका आणि प्रिंस या कपलची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. चाहतेही त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंच्या प्रतीक्षेत असतात. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशलवर शुभेच्छांचा पूर आलेला दिसत आहे.

प्रिंस आणि युविका यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी 12 ऑक्टोबर 2018 रोजी लग्न केलं होतं. बिग बॉस 9 मध्ये हे कपल एकमेकांना भेटलं होतं जिथं त्यांच्यातील जवळीकता वाढली होती.

प्रिंसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रोडीज आणि स्पिल्ट्सव्हिला शोचा विनर आहे. याशिवाय प्रिंस युविका सोबत नच बलिए रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसला आहे. तो बिग बॉस 9 मध्येही झळकला आहे.

युविकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर बिग बॉस आणि नच बलिए व्यतिरिक्त तिनं पंजाबी सिनेमातही काम केलं आहे.

 

You might also like