Birthday SPL : जेव्हा ‘फॅशन’ मॅगेझिनच्या कवर पेजवर छापून आला होता सुहाना खानचा फोटो, सारेच झाले होते ‘चकित’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसत आहे. सुहानानं आपल्या घरीच आपला बेली डान्स क्लास सुरू केला आहे. सुहाना आपल्या फोटोंमुळं नेहमीच चर्चेत येत असते. आज सुहाना 20 वर्षांची झाली आहे. सुहाना सोशलवर कायमच सक्रिय असते. सुहाना तेव्हा खूप चर्चेत आली होती जेव्हा पहिल्यांदा एका मासिकाच्या कवर फोटोवर दिसली होती.

2018 मध्ये सुहाना एका फॅशन मॅगेझिनच्या कवर पेजवर दिसली होती. यावेळी सुहाना दबरदस्त चर्चेत आली होती. सुहानाचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर लगेच सर्वजण अंदाज लावू लागले की, लवकरच सुहाना सिनेमात दिसू शकते. परंतु असं काहीच झालं नाही.

सुहानाचा हा फोटो खुद्द गौरी आणि शाहरुख खाननं ट्विटरवरून शेअर केला होता. फोटो शेअर करताना शाहरुख म्हणाला होता, “तिला पुन्हा एकदा हातात उलचून घेत आहे. वोग तुझे आभार. तुला खूप सारं प्रेम आणि हग. हेलो सुहाना खान.” शाहरुखच नाही तर करण जोहरनंही सुहानाचा फोटो शेअर केला होता.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1024392674177179650?s=20