BirthdaySpecial : ‘दिग्गज’ अभिनेता देवानंदच्या ऑफरमुळं बदललं ‘टीना मुनीम’चं आयुष्य, ‘अशी’ बनली अंबानी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीना मुनीम त्या कलाकारांपैकी आहे ज्यांचं फिल्म इंजस्ट्रीत येणं म्हणजे एक योगायोग म्हणावं लागेल. 80 च्या दशकात टीना आपल्या मोठ्या पडद्यावरील करिअरसोबतच आपल्या कलाकारांसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत राहीली आहे.

बॉलिवडमधील आपल्या करिअरनंतर टीना देशतील सर्वात प्रतिष्ठित उद्योग घराण्यांपैकी एक अंबानी घराण्याची सून झाली. पडद्यासोबतचं नातं तुटल्यानंतर टीनानं पुन्हा वळून पाहिलं नाही. यानंतर तिनं स्वत:ला कौटुंबिक आणि समाजिक जबाबदारीत गुंतवून ठेवलं. आज टीना आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहे.

1975 मध्ये आतंरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर देवानंद यांची नजर टीनावर पडली. यानंतर देस परदेस या सिनेमातून टीनानं आपला डेब्यू केला. टीना अशा गुजराती कुटुंबातील आहे ज्यांचं सिनेमासोबत दूरपर्यंत कोणतं नातं नव्हतं. इतकेच नाही तर तिलाही सिनेमात रस नव्हता. परंतु देवानंदसारख्या दिग्गज अभिनेत्यानं विचारल्यानंतर कोणी कसंकाय प्रस्ताव नाकारू शकतं.

https://www.instagram.com/p/B8Okw_dhw5J/

जोपर्यंत टीना कॉलेजसाठी कॅलिफोर्नियाला जात नाही तोपर्यंत म्हणजेच 1987 पर्यंत तिचं फिल्मी करिअर सुरू होतं. या दरम्यान तिनं 30-35 सिनेमात काम केलं. यातील संजय दत्त सोबत केलेला रॉकी हा सिनेमा सुपरहिट ठरला.

टीनानं आपल्या करिअरमध्ये जास्त सिनेमे राजेश खन्नसोबत केले. ज्यात फिफ्टी फिफ्टी, सौतन, बेवफाई, सुराग, इंसाफ मैं करूंगा यांसारखे सिनेमे आहेत. टीनानं ऋषी कपूरसोबत कर्जसारख्या हिट सिनेमात काम केलं. अमोल पालेकर सोबत बातो बातो में हा सिनेमाही तिनं केला.

1991 मध्ये 31 वर्षांची झाल्यानंतर टीनानं उद्योगपती अनिल अंबानीसोबत लग्न केलं. सध्या टीना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णलयाची चेअरपर्सन आहे. टीना अनके सामाजिक कार्यातही सहभाग घेत असते. टीना आणि अनिल अंबानी यांना दोन मुलं आहेत. जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी अशी त्यांची नावे आहेत.