सिंगर हार्ड कौरचा आता ‘बिग बी’ अमिताभ आणि ‘खिलाडी’ अक्षयकुमारवर ‘निशाणा’, केलं ‘हे’ वक्‍तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथवर आक्षेपार्ह टीका करत वादात सापडलेली बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर हार्ड कौर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हार्ड कौरने आपल्या इंस्टाग्रामवरून अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन सहित अनेक सेलेब्रिटींवर टीका केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये वाढत्या पेट्रोलच्या किंमतींचा उल्लेख केला आहे. बॉलिवूड कलाकारांबाबत वाईट शब्दात वक्तव्य केलं आहे. तिची पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अद्याप कोणत्याही सेलेब्रिटीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

हार्ड कौरने एक फोटो शेअर केला आहे. यात लिहिले आहे की, “अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि चेतन भगत यांसारख्या सेलेब्रिटींनी काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवर खूप गोंधळ केला होता. परंतु भाजपा सरकारने वाढवलेल्या पेट्रोलच्या किंमतीवर हे लोक गप्प आहेत.” या पोस्टमध्ये तिने या कलाकारांच्या ट्विटर पोस्टचे स्क्रिनशॉट्सही शेअर केले आहेत. तिचे असे म्हणणे आहे की, बॉलिवूडमधील ९० टक्क्यांहून अधिक मोठे सेलेब्रिटी भारतातील सर्वात बेकार लोक आहेत. या पोस्टमध्ये तिने शिवीचाही वापर केला आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, हार्ड कौरने आपल्या परफॉर्मंसने बेस्ट फीमेल सिंगरचा पुरस्कारही मिळवला आहे. आपल्या सोलो अल्बमने आपली ओळख बनवणारी हार्ड कौर एकेकाळी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फीमेल रॅपर होती. सध्या मात्र हार्ड कौर केवळ वादामुळे चर्चेत येताना दिसत आहे. याआधी तिने रॅपर बादशाहवरही एका पोस्टमधून निशाणा साधला आहे.

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

 

 

 

You might also like