जेव्हा सपना चौधरीनं ‘भोजपरी स्टार’ रवी किशनला आपल्या तालावर थिरकायला लावलं ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असते. सपनाचा एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक खास बात आहे ज्यामुळं हा व्हिडीओ सोशलवर वारंवार पाहिला जात आहे.

स्टार डान्सर सना चौधरीचा एक डान्स व्हिडीओ सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
यार तेरा चेतक पे चले या गाण्यावर सपना जोरदार ठुमके लगावताना दिसत आहे. खास बात अशी आहे की, भोजपुरी सुपरस्टार रवी किशन देखील सपनासोबत थिरकताना दिसत आहे. तसं पाहिलं तर तिचा हा व्हिडीओ जुनाच आहे. यात सपना जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, याला अद्याप कोट्यावधी लोकांनी पाहिलं असून अजूनही लोक वारंवार हे गाणं पहात आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

व्हिडीओत दिसत आहे की, सपना आणि रवी किशन स्टेजवर जबरदस्त डान्स करत आहेत. सपना चौधरीची एकेक स्टेप रवी किशन रॉपी करत आहेत. दोघांनी असा डान्स केला की लोक त्यांचे दीवाने झाले.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.