‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा ‘हा’ डान्स व्हिडीओ Youtube घालतोय ‘धुमाकूळ’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री, सिंगर आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असते. सपनाचा एका डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

स्टार डान्सर सना चौधरीचा एक डान्स व्हिडीओ सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. तू चीज लाजवाब असं या गाण्याचं नाव आहे. तसं पाहिलं तर तिचा हा व्हिडीओ जुनाच आहे. यात सपना जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, आतापर्यंत या गाण्यानं युट्युबवर 25 कोटींहून अधिक व्ह्युज मिळवले आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या तिच्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे गाणं राजू पंजाबीनं गायलं आहे. एंडि दहियानं हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याची पॉप्युलॅरिटी पाहून हे गाणं 2 व्हर्जनमध्ये रिलीज करण्यात आलं आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.