Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरी वेट लॉस करून ‘फुल फिट’ ! आई झाल्यानंतर स्टेज शोमध्ये दिसला जबरदस्त डान्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते, तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव असते. सपनाचा एक डान्स व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सपना चौधरीनं आई झाल्यानंतर दिल्लीत आपल्या एका कमबॅक परफॉर्मसनं साऱ्यांना चकित केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट डान्स व्हिडिओनं धमाल केली आहे. आई झाल्यानंतर ती आधीपेक्षाही सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की, सपनानं वेट लॉस केलं आहे. आता ती पुन्हा तिच्या जुन्या फिटनेसकडे आली आहे.

स्टार डान्सर सपना चौधरीचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात हरियाणवी गाण्यावर सपना जोरदार ठुमके लगावताना दिसत आहे. सपनाचा जबरदस्त डान्स पाहून प्रेक्षकही पागल झाले आहेत. सपनाचा हा डान्स एवढा व्हायरल झाला आहे की, याला अद्याप कोट्यवधी लोकांनी पाहिलं असून, अजूनही लोक वारंवार हे गाणं पाहात आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

4 ऑक्टोबर रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारीत बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत सिक्रेट मॅरेज केलं होतं. सपना चौधरीची लोकप्रियता गगनाला भिडली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्समधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.

You might also like