Birthday SPL : वाढदिवशीच मोडलं होतं ‘हेलन’चं 16 वर्षांचं लग्न ! असं झालं होतं सलीम खानवर प्रेम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून सिनेमात तडका लगावणाऱ्या डान्सर आणि अदाकारा हेलन (Helen) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. आज आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

21 नोव्हेंबर 1938 रोजी बर्मा येथे जन्मलेल्या हेलन यांनी 19 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. आपल्या डान्स आणि अदाकारीनं त्यांनी साऱ्यांचं मन जिंकलं होतं. लोकांच्या मनात त्यांनी खास जागा बनवली होती.

हेलनच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिच्या आईन ब्रिटिश सैनिकासोबत दुसरं लग्न केलं जे शहीद झाले होते. यानंतर त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरू झाला. हेलन आईसोबत कोलकात्याला गेली. तिथं त्यांना कुक्कू मोरे भेटल्या ज्या सिनेमात बॅकग्राउंड डान्सर होत्या. त्यांनीच हेलनची बॅकग्राउंड डान्सर म्हणून सिनेमात एन्ट्री करून घेतली.

19 वर्षीय कोवळ्या आणि सुंदर हेलनला हावडा ब्रिज सिनेमात मोठा ब्रेक मिळाला. मेरा नाम चिन चिन चू या गाण्यानं त्यांचं नशीब उजळलं. यानंतर हेलन बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल बनली. 1957 रोजी डायरेक्टर पीएन अरोरा सोबत त्यांनी लग्न केलं. जे त्यांच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठे होते. परंतु 16 वर्षांनंतर म्हणजेच हेलनच्या 35 व्या वाढदिवशी त्यांचं हे नातं तुटलं.

यानंतर 1962 साली काबिल खान सिनेमाच्या दरम्यान हेलन आणि सलीम खान (Salim Khan) यांची भेट झाली. तिच्या आयुष्यातील कठीण काळात सलीम हेलनचा आधार बनले. दोघंही एकमेकांना हृदय देऊन बसले.

सलीम यांनी हेलनच्या अडचणी दूर करण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहित असूनही त्यांनी तिच्याशी लग्न केलं आणि दुसरी पत्नी म्हणून त्यांना घरात जागा दिली. 1980 साली हे लग्न झालं होतं.

यानंतर या लग्नामुळं पहिली पत्नी आणि मुलांनी बंड केलं. सलीम यांची चारही मुलं आईच्या बाजूनं उभी होती. परंतु काळानं वाढलेलं अंतर कमी केलं.

 

You might also like