अखेर अमीरने सांगितले पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या १७-१८ वर्षापासून पुरस्कार सोहळ्यांपासून दूर राहणे पसंत करतो. बॉलिवूडमध्ये त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. या चित्रपटांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात येते. मात्र तरीदेखील हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमिर या सोहळ्यांला उपस्थित नसतो. त्यांच्या या अनुपस्थिती मागेदेखील एक खास कारण आहे.

१९९२ साली अभिनेता अनिल कपूरचा ‘बेटा’ आणि आमिरचा ‘जो जीता वही सिकंदर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आमिरचा ‘जो जीता वही सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाला होता. मात्र इतकी लोकप्रियता मिळूनही या चित्रपटाला याच वर्षात झालेल्या पुरस्कारातून डावलण्यात आले. १९९२ साली झालेल्या पुरस्कार सोहळ्यात आमिरच्या चित्रपटाला डावलून ‘बेटा’ या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे आमिरच्या मनात पुरस्कार सोहळ्यांविषयीची असलेली आपुलकी कमी व्हायला लागली.

‘जो जीता वही सिकंदर’ नंतर आणखी एका पुरस्कार सोहळ्यामध्ये आमिरच्या ‘रंगीला’ आणि ‘हम है राही प्यार के’ या चित्रपटांना डावलण्यात आले. या सोहळ्यामध्ये ‘बाजीगर’ आणि ‘दिलवाल दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे शाहरुखला बेस्ट अँक्टर पुरस्काराने गौरविण्यात आले. या घटनेनंतर पुरस्कार सोहळ्यात आपल्याला नेहमी डावलले जाते हे पाहून आमिरने पुरस्कार सोहळ्यांपासून चार हात दूर राहण्याचा संकल्प केला होता. आमिरच्या ‘लगान’ चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्यावेळी त्याने आपला निश्चय मोडल्याचे पाहायला मिळाले. आमिर खान ऑस्करच्या सोहळ्यासाठी गेला होता. परंतु त्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही. तेव्हापासून आतापर्यंत आमिरने एकाही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली नाही.

ह्याही बातम्या वाचा –

सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय वायुसेनेकडून अलर्ट जारी

पवारांनंतर आता सुभाष देशमुख यांचाही माढ्यातून यु-टर्न

‘त्या’ मनुष्यबळाचा राजकीय प्रचारासाठी वापर करण्यास प्रतिबंध

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन , दोन्ही देशातील व्यवहार बंद