धक्कादायक ! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’, 60 हजारात बॉलिवूडच्या ज्युनियर आर्टिस्टचा ‘सौदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेटशी कथितपणे संबंधित बॉलिवूडच्या एका कास्टींग डायरेक्टरला उपनगर वर्सोवातून अटक केली आहे. यात एका मेकअप आर्टीस्टची आणि ज्युनियर आर्टीस्टची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागे अनेक मोठ्या लोकांशी जोडले गेलेले असण्याची शक्यता आहे.

60 हजारांत व्हायचा ज्युनियर आर्टीस्टचा सौदा

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, एका अधिकृत सूचनेनंतर सामाजसेवा शाखेनं 32 वर्षीय नवील प्रेमलाल आर्य याला अटक केली आहे. तो दोन पीडितांचा 60-60 हजारांना सौदा करत होता.

अनेक महिन्यांपासून सुरू होता वेश्या व्यवसाय, मॉडेल आणि अ‍ॅक्टर यांचाही समावेश

आरोपीची चौकशी करताना असं समजलं की, गेल्या काही महिन्यांपासून हे रॅकेट चालवलं जात होतं. अनेक मॉडेल आणि बॉलिवूडमधील कलाकार यात सहभागी आहेत.

सामाजसेवा शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदेश येवले यांनी सांगितलं की, “सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिला पश्चिम बंगालच्या आहेत. दिल्लीत या रॅकेटशी संबंध असणाऱ्या दलाल अश्विन कुमारच्या संपर्कात होत्या. यानेच त्यांना मुंबईत पाठवलं होतं. प्रेमलाल आर्यच्यो दोन सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.”

काही दिवसांपूर्वीही झाली होती अटक

या महिन्याच्या सुरुवातीलाच बॉलिवूडच्या एका प्रॉडक्शन मॅनेजरला कथित रुपाने सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. जुहूतील उपनगरातील एका 4 स्टार हॉटेलात सेक्स रॅकेट चालवत असल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, गुप्त सूचनेच्या आधारे सामाजसेवा शाखेने झेड लक्जरी रेसिडेंसी हॉटेलमधून प्रॉडक्शन मॅनेजर राजेश कुमार लाल याला अटक केली आहे. या छापेमारीत उज्बेकिस्तानच्या दोन मुलींची सुटका करण्यात आली होती. याच हॉटेलातून 3 महिन्यांपूर्वी 3 महिलांची सेक्स रॅकेटमधून मुक्तता केली होती असंही त्यांनी सांगितलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/