‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकची घोषणा ! आगामी 2 वर्षात रिलीज होणार ‘हे’ स्पोर्ट्स बायोपिक सिनेमे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2020 च्या सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती की, सोन चिडीया नंतर डायरेक्टर अभिषेक चौबे (Abhishek Chaubey) यांचा आगामी सिनेमा हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचं बायोपिक असेल. आधीच सिनेमाची अधिकृत घोषणा झाली आहे. रॉनी स्क्रूवाला सिनेमाची निर्मिती करत आहे. रॉनीची कंपनी आरएसव्हीपीनं सोशलवरून याची घोषणा केली होती. परंतु सिनेमाच्या स्टार कास्ट बद्द अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 2021 किंवा 2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आगामी काळात बॉलिवूडमध्ये अनेक स्पोर्ट लिजेंडचं बायोपिक पहायला मिळणार आहे. अलीकडेच बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. आनंद एल राय हा सिनेमा बनवत आहेत. अद्याप स्टार कास्टची घोषणा झालेली नाही. 2021 रोजी सिनेमाची शुटींग सुरू होईल.

भारतीय फुटबॉल टीमचे कोच सईद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारीत मैदान हा सिनेमा आहे. सईद अब्दुल रहिम 1950 ते 1963 पर्यंत फुटबॉल टीमचे कोच होते. अजय देवगण रहिम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना मॉडर्न इंडियन फुटबॉलचा आर्कीटेक्टही म्हटलं जातं. बधाई हो हा सिनेमा डायरेक्ट करणारे अमित शर्मा (Amit Sharma) हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. त्यांचा हा बॉलिवूडमधील दुसरा सिनेमा आहे. 15 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. म्हणजेच तब्बल अकरा महिन्यानंतर हा सिनेमा रिलीज होणार आहे. मोठ्या स्केलवर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा 4 भाषांमध्ये रिलीज होईल.

भारताची स्टार बॅडमिंटनपटून सायना नेहवाल हिचं बायोपिकही अंडर प्रॉडक्शन आहे. बॉलिवूड ॲक्ट्रेस परिणिती चोपडा (Parineeti Chopra) सायनाची भूमिका साकारणार आहे. अमोल गुप्ते सिनेमा डायरेक्ट करत आहेत. आधी श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती.

महिला क्रिकेट टीमची टेस्ट आणि वन डेची कॅप्टन मिताली राजचं बायोपिक शाबाश मिठू देखील पाईपलाईनमध्ये आहे. राहुल ढोलकिया सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. तापसी पन्नू ही प्रमुख भूमिकेत आहे. याचा फर्स्ट लुक देखील रिलीज झाला आहे.

ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट शुटर अभिनव बिंद्रा यांचं बायोपिक देखील निर्माणाधीन आहे. यात हर्षवर्धन कपूर टायटल रोलमध्ये आहे. कन्नन अय्यर डायरेक्टडे या सिनेमात अनिल कपूर देखील काम करताना दिसणार आहे.