हॉलीवुड अभिनेत्री पामेला एंडरसननं 12 दिवसांपुर्वी केलेलं लग्न ‘मोडलं’, पाचव्यांदा केलं होतं ‘मॅरेज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसन हिने ती आणि जॉन पीटर्स वेगळे होणार असल्याचे सांगितले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लग्नाच्या 12 व्या दिवसानंतर ही बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पामेला एंडरसनने पुन्हा लग्न केल्याची बातमी मिळाली होती. बेवॉच स्टारने जॉन पीटर्सशी मालिबूमधील एका सिक्रेट समारंभात लग्न केलं होतं.

त्यानंतर आता लग्नाच्या अवघ्या १२ दिवसानंतर पामेला हिने सांगितले कि, तिने आणि तिच्या नवविवाहित पतीने दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीत पामेलाने सांगितले की, त्यांना जीवनाकडून आणि एकमेकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी काही काळ एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.” पामेलाने तिच्या लग्नाने आनंदी असलेल्या सर्वांचे आभार मानले. दरम्यान, विभक्त होण्याच्या निर्णयानंतर तिला आता थोडी प्रायव्हसी हवी आहे.

पामेला एंडरसन म्हणाली, “जॉन आणि माझ्या लग्नात आम्हाला शुभेच्छा देण्याऱ्यांची मी खूप आभारी आहे. जीवन एक यात्रा आहे आणि प्रेम ही एक प्रक्रिया आहे. हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या विवाह प्रमाणपत्राची औपचारिकता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारी रोजी झालेल्या विवाहसोहळ्यानंतर या जोडप्याने कायदेशीर विवाहासाठी प्रमाणपत्र मागितलेले नाही.

https://www.instagram.com/p/B8C8tN9g-rG/?utm_source=ig_embed

एंडरसन आणि पीटर यांचे चार विवाह आहेत. एंडरसन आणि पीटर यांनी 30 वर्षांपूर्वी डेट केले होते. काही महिन्यांपूर्वी दोघांची पुन्हा भेट झाली पण त्यांनी आपले नाते लपवून ठेवले. पामेला आणि जॉनने आपल्या मुलांनाही लग्नात बोलावले. पामेला एंडरसन भारताच्या बिग बॉसच्या एका सीझनमध्ये दिसली होती.