Coronavirus : बॉलिवूड ते हॉलिवूड ! टॉम हॅक्स, कनिका कपूरसह ‘हे’ 10 स्टार्स ‘कोरोना’च्या विळख्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरसनं अनेक स्टार्सना आपल्या कचाट्यात पकडलं आहे. बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत अनेक सेलेब्सो कोरोना पॉझिटीव निघाले आहेत. हे सर्व बाधित स्टार्स आता आयसोलेशनमध्ये आहेत. यात एकूण 10 कलाकारांचा समावेश आहे.

1) कनिका कपूर – बॉलिवूडमधील हे पहिलंच प्रकरण आहे. सध्या कनिका आयसोलेशनमध्ये आहे. लंडनवरून आलेली कनिका कोरोना पॉझिटीव निघाली आहे.

2) टॉम हॅक्स आणि पत्नी रीता विल्सन – या दोघांच्या पॉझिटीव असल्याच्या बातमीनं सारेच अवाक् झाले होते.

3) ओल्गा कुरीलेंको – ओल्गानं कोरोना झाल्याचं तिच्या इंस्टावरून पोस्ट शेअर करत सांगितलं होतं.

4) इद्रीस एल्बा – ब्रिटीश अ‍ॅक्टर म्युझिशियन इद्रीस एल्बानं 16 मार्च 2020 रोजी तो कोरोना पॉझिटीव असल्याचं सांगितलं होतं. सध्या तो आयसोलेशनमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B8M6rJBBGHa/

5) क्रिस्तोफर हिज्जू – गेम्स ऑफ थ्रोन्समधील या प्रसिद्ध अभिनेत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

6) रिशेल मॅथ्यूज – या अभिनेत्रीनंही 16 मार्च 2020 रोजी चाहत्यांना याबाबतची वाईट बातमी सांगितली की, तिला कोरोना झाला आहे.

https://www.instagram.com/p/B9kzV5uH3vV/

7) डॅनियल डी किम- या अभिनेत्यानं इंस्टावरून व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं की, त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

8) शॉर्लोट लॉरेंस- या सिंगरलाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे.

9) डेबी मजार- डेबी 15 मार्च 2020 रोजी आजारी पडली होती. तिलाही कोरोनाची लागण झाली आहे.

10) हार्वे विंस्टीन- सध्या हा निर्माता जेलमद्ये लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. त्याला जेलमध्येच कोरोनाची लागण झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bw032mJAjPL/