बॉलिवूडमधील सर्वात महाग सिनेमा असणार ‘हृतिक-दीपिका’चा Fighter ! 250 कोटींमध्ये तयार होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ॲक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लवकरच पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. अलीकडेच हृतिकच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यानं अपकमिंग फायटर सिनेमाचा टीजर रिलीज केला होता. या सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन पहायला मिळणार आहेत. त्यामुळं हा सिनेमा बॉलिवूडमधील सर्वात महाग सिनेमा ठरू शकतो.

सिनेमाचा टीजर जरी रिलीज झाला असला तरी मात्र सिनेमाबद्दल आतील माहिती काही समोर आलेली नाही. एका वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिकाच्या या सिनेमाचं बजेट 250 कोटी ठेवण्यात आलं आहे. जर ही बाब खरी ठरली तर हा सिनेमा अॅक्टरच्या करिअरमधील सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो.

रिपोर्ट्स असे आहेत की, सिनेमात असे फाईट सीन आणि चेज सीक्वेंस असतील जे काळजाची धडधड वाढवतील. वॉर सिनेमा प्रमाणेच फायटर हा सिनेमाही देशप्रेम आणि देशभक्तीवर आधारीत असणार आहे.

या सिनेमात ॲक्ट्रेस दीपिका पादुकोण हिचा काय रोल असणार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सिनेमात फक्त देशबक्ती नाही तर रोमँसही पहायला मिळणार आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज करण्याचा प्लॅन आहे.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता. आता लवकरच तो फायटर सिनेमात दिसणार आहे.