…म्हणून किचनमध्ये केलेल्या फोटोशुटने अभिनेत्री हुमा कुरेशी ‘प्रचंड ट्रोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार हुमा कुरेशीने नुकतंच फोटोशुट केलं आहे. सोशल मीडियावरून हुमाने आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काहींना हुमाचे हे फोटो खूपच आवडले आहे तर, काहींना या फोटोत एक गोष्ट खूपच खटकली आहे. ज्यामुळे हुमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

हुमाने आपले हे नवीन फोटोशुट किचनमध्ये केले आहे. फोटोंमध्येही ते स्पष्ट दिसत आहे. हुमा शुज घालून आपलं फूड एन्जॉय करतानाही दिसत आहे. याशिवाय एका फोटोत हुमाने टू-ट्यूल बस्टियर गाऊन घालून किचन स्लॅबवर पाय ठेवल्याचे दिसत आहे.

फोटोमध्ये स्लॅबवर पाय ठेवून हुमा शुजची लेस बांधत आहे. यामुळे हुमा सोशल मीडियावर ट्रेलर्सच्या निशाण्यावर आली आहे. जेवण बनवण्याच्या ठिकाणी शुज ठेवल्याने युजर्स तिला ट्रोल करताना दिसत आहे.

युजर्सचं म्हणणं आहे की, हुमाने जेवणाच्या ठिकाणी असं शुज घालायला नको होतं आणि आणि तिथे किचन स्लॅबवर शुज घालून पाय ठेवायलाही नको होता. एका युजरने म्हटले आहे की, “हेच पहायचं राहिलं होतं. कोणत्या शेफने असे करण्यास हिला परवानगी दिली आहे ? लाज वाटायला हवी.”

आणखी एका युजरने म्हटले आहे की, “जिथे जेवण बनवलं जातं त्या किचनचा आदर कर.” अशा प्रकारच्या इतर अनेक कमेंट्सने हुमा कुरेशी सतत ट्रोल होत आहे. हुमाने मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, हुमाने हे फोटोशुट पॉप्युलर आणि जुलैमध्ये इश्यु होणाऱ्या Cosmopolitan India या मॅगेझिनसाठी केलं आहे. कवर फोटोमधील हुमाचा चेहरा खूपच ग्लोईंग दिसत आहे.

 

image.png

image.png

image.png

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like