17 वर्षापुर्वीच्या ‘हंगामा’चा सिक्वल येणार, परेश रावल अन् शिल्पा शेट्टीसह ‘हे’ स्टार दिसणार (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2003 साली आलेल्या हंगामा या कॉमेडी सिनेमाचा सिक्वल तयार केला जाणार आहे. हंगामा 2 या सिनेमात शिल्पा शेट्टी, परेश रावल, मिजान जाफरी, साऊथ अ‍ॅक्ट्रेस प्रणिता सुभाष आणि राजपाल यादव इत्यादी कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे.

ट्रे़ड अ‍ॅनलिस्ट आणि फिल्म क्रिटीक तरण आदर्शनं याबाबत माहिती दिली आहे. तरणनं ट्विट करत म्हटलं आहे की, “हंगामा 2 चं नवीन पोस्टर… परेश रावल, शिल्पा शेट्टी कुंद्रा, मिजान जाफरी आणि प्रणिता सुभाष..! प्रयिदर्शननं हा सिनेमा डायरेक्ट करणार आहे. रतन जैन, गणेश जैन, चेतन आर जैन आणि अरमान व्हेंचर्स मिळून हा सिनेमा प्रोड्युस करणार आहेत.”

हंगमा 2 हा सिनेमा 14 ऑगस्ट 2020 रोजी रिलीज होणार आहे. अत्तरिनतिकी दरेदी, सगुनी, पोरकी, आणि ब्रह्मा यांसारख्या साऊथ इंडियन सिनेमात दिसलेली अभिनेत्री प्रणिता सुभाष हंगामा 2 मधून सर्वांना हसवणार आहे.”

17 वर्षांपूर्वी रिलीज झालेला हंगामा हा सिनेमादेखील प्रियदर्शननं डायरेक्ट केला होता. या सिनेमात परेश रावल, अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदसानी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा सिनेमा चाहत्यांना खूप आवडला होता.