कंगना राणावतनं स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगितलं, म्हणाली – ‘सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना राणावत तिच्या वादग्रस्त बडबडीमुळे सातत्याने समाज माध्यमात चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत केस मध्ये तिने बॉलिवूडमधील लोकांवर अनेक आरोप केले आहेत. तसेच शिवसेनेसोबत सुद्धा तिने पंगा घेतला होता. तथापि, आता ट्विट करत कंगना म्हणाली, मी माझं मुंडक उडवून घेईन, पण डोके खाली झुकवणार नाही. तसेच तत्वांसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचं तिने म्हटलं आहे.

ट्विट करत कंगनाने म्हटलं की, मी क्षत्रिय आहे. डोके कापून घेऊ शकते पण झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज बुलुंद ठेवेन. मान, सन्मान, स्वाभिमानसोबत जगले आहे आणि गर्वाने राष्ट्रवादी बनून जिंकत राहीन. तत्वांसोबत कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद.

दरम्यान, जया बच्चन यांच्यावर टीका केल्यानंतर बॉलिवूड तसेच समाज माध्यमातून कंगनावर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर कंगनाने ही प्रतिक्रिया दिली आहे. तिचे हे ट्विट समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जया बच्चन यांनी काय म्हटलं होत
राज्यसभेत रवी किशन यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूड विरुद्ध वक्तव्य केलं आहे. हे लाजिरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नसून तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात खातात त्यालाच छिद्र पाडायचे ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची गरज आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

जया यांच्यावर कंगनाची टीका
कंगनाने जया यांच्यावर टीका करत, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यात दोन मिनिटांचा आयटम नंबर्स आणि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तो सुद्धा हिरो बरोबर शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्रधान्य असलेल्या भूमिकांनी सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला तिने लगावला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like