दीपिकाला ‘KISS’ केल्यानंतर अवॉर्ड घ्यायला स्टेजवर गेला रणवीर सिंग ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  आयफा अवॉर्ड्स 2019 (IIFA) मध्ये सर्व बॉलिवूड स्टार्सने जबरदस्त सादरीकरण केलं. आयफा अवॉर्ड्स 2019 मध्ये अभिनेता रणवीर सिंगला बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून गौरवण्यात आलं. पद्मावत या सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचे नाव पुकारल्यानंतर अवॉर्ड घेण्याआधीच रणवीरने पत्नी दीपिक पादुकोणला किस केलं. नंतर त्याने स्टेजवर स्पीच दिलं. यानंतर सर्वजण भावूक झाले. राजी सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस म्हणून आलिया भट्टला गौरवण्यात आलं.

रणवीर स्टेजवर गेल्यानंतर सर्वांचे आभार मानले. दीपिकाला धन्यवाद देताना तो म्हणाला, “दीपिका तू मला प्रत्येक दिवशी इंस्पायर करते. माझ्या पत्नीला पहिल्या रांगेत बसून मला हा अवॉर्ड घेताना पाहून अभिमान वाटत असेल. मी देवाकडे यापेक्षा जास्त काय मागू शकतो. हे बोलतानाच त्याच्या डोळ्यात पाणी आले.

आयफा अवॉर्ड्स प्रत्येक वर्षी बॉलिवूड स्टार्स आणि तांत्रिक क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. 2000 साली या अवॉर्ड्स शो ला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम तेव्हा लंडनला आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक वर्षी वेगळ्या देशात हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

Visit : policenama.com

You might also like