वडिल वीरू देवगण यांच्या पहिल्या पुण्यतिथीला ‘भावूक’ झाला अजय ! ‘अनसीन’ फोटो शेअर करत दिला ‘हा’ मेसेज (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अजय देवगणचे वडिल वीरू देवगण यांची आज (बुधवार दि 27 मे 2020) पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी वीरू देवगण यांचं निधन झालं होतं. अजयनं आता वडिल वीरू यांना मिस करत त्यांचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत.

अजयनं नुकताच ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अजय आणि वडिल वीरू यांचे अनेक अनसीन फोटो आहेत. व्हिडीओ शेअर करताना अजय म्हणतो, “डिअर डॅड, तुम्हाला जाऊन एक वर्ष झालं आहे. परंतु मला तुम्ही माझ्या आसपासचं जाणवत असता. शांत, केअरींग, प्रोटेक्टीव. तुमची उपस्थिती सुखद असते.”

वीरु देवगन यांनी 85 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 27 मे रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 1999 साली मुलगा अजय देवगन आणि बिग बी अमिताभ बच्चन स्टारर हिंदुस्तान की कसम या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती वीरू देवगन यांनी केली होती. त्यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाले तर, त्यांनी 80 हून अधिक सिनेमांसाठी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. लाल बादशाह, इश्क, क्रांती, जान, हकीकत यांसारख्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. दिल क्या करे या सिनेमाची निर्मिती तसेच क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या सिनेमातदेखील त्यांनी काम केले आहे.