बिग बॉस 13 ची स्पर्धक रश्मी देसाईने शेयर केले ग्लॅमरस फोटो, जोरदार होतायेत व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 मधील स्पर्धक रश्मि देसाई हिने नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. रश्मी देसाई हॉट दिसण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. हे तिच्या टीव्ही शो किंवा सोशल मीडिया अकाउंटलाही लागू होते. असे म्हटले जाऊ शकते की, रश्मी आपल्या स्टाईल स्टेटमेंट सोबत स्टेटस बार वाढवित आहे. तिचा नुकताच केलेला प्रयत्न बर्‍यापैकी धाडसी आहे. रश्मीचा फोटो पाहून बरेच चाहते दंग झाले आहेत. तिने नुकत्याच केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रश्मी सिंगल ब्ल्यू पँटसूटमध्ये दिसली आहे, तिने शर्ट न घालता फोटोशूट केला आहे.यामध्ये ती बरीच बोल्ड दिसत आहे. कोल्ड आईज, पॉप पर्पल लिप कलरसोबत तिचा लुक स्टाईल करीत तिने अ‍ॅक्सेसरी म्हणून डेंगलिंग इयररिंग्स घातली आहेत. सोबतच मिरर वर्क स्लिप-ऑन मोजरिससोबत आपला लुक पूर्ण करताना रश्मी स्टनिंग दिसत आहे. रश्मीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनेक पोझ्स पहिल्या जाऊ शकतात. दरम्यान, रश्मी जाहिरातीसाठी शूट करत आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

रश्मीच्या फोटोजप्रमाणे तिच्या पोस्टचे कॅप्शनही चुकवता येत नाही. रश्मीने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले आहे की, ‘तिला एका हिरोची आवशक्यता होती …. म्हणून तिने तेच बनणे निवडले’, त्यानंतर तिने राजकुमारीची इमोजी शेअर केली. अलीकडच्या काळात रश्मीने आणखी एक फोटोशूट केले आहे. त्यामध्ये तिने आपल्या केसांना ब्रेड्समध्ये बांधून नवीन लूक ट्राय केला आहे. याशिवाय ती तिचा नागीण लुक जोडायला विसरला नाही. एकता कपूरचा टीव्ही शो, नागिन 4 संपल्यानंतर रश्मीने तिच्या पुढच्या प्रोजेक्ट्सबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.

दरम्यान, बिग बॉसमध्ये रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ल यांच्यातील भांडण प्रेक्षकांना खूपच आवडत होते. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यामुळे हा कार्यक्रमही खूप लोकप्रिय झाला होता.सिद्धार्थ शुक्ला अखेर बिग बॉस 13 चा विजेता बनला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like