जान्हवी कपूरने केला बॅकलेस फोटोशूट; फोटो होताहेत व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर ‘हालिया फोटोशूट’चे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूर सिल्व्हर टॉप आणि पिंक पँटमध्ये दिसत आहे. तिने मेकअपही केला आहे. याशिवाय तिने पर्पल कलरचा आयलायनरही लावला आहे.

जान्हवी कपूरने फोटोंमध्ये केस बांधलेले दिसत आहे. तसेच तिने इअररिंगही घातले आहे. आता तिचे हेच फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने याला ‘पलट’ नाव दिले आहे. याशिवाय त्यावर रुही डे सेकंड लिहिले आहे. जान्हवी कपूर लवकरच फिल्म रुहीमध्ये दिसणार आहे. या फिल्मशिवाय ती ‘गुड लक जेरी’मध्येही दिसणार आहे. जान्हवी कपूरने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारली आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर
जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने भूमिका केलेली ‘गुंजन सस्केना : द कारगिल गर्ल’ अनेक कारणांमुळे वादातही अडकली होती. आता ती लवकरच ‘रुही’ चित्रपटात दिसणार आहे. तिने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता.