Poonam Pandey Engagement : ‘हॉट’ पूनम पांडेनं बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी ‘गूपचूप’ केला साखरपुडा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फिल्म अभिनेत्री पूनम पांडेने अनेक वर्षांपासून असलेला तिचा प्रियकर सॅम बॉम्बेशी एंगेजमेंट केली आहे. तिने यास ‘सर्वोत्कृष्ट भावना’ असे संबोधले. सॅमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून त्यात त्याने एंगेजमेंटची रिंग दर्शविली आहे आणि त्यावर कॅप्शन दिले आहे की, ‘आम्ही शेवटी केले!’ यावर प्रतिक्रिया देताना पूनमने लिहिले की, ‘उत्तम वाटत आहे.’ सोबतच हृदयाचे एक इमोजीही शेअर केले आहे. त्यांचे अनुयायी त्यांचे अभिनंदन करत आहेत. एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, ‘या मोठ्या निर्णयाबद्दल खूप अभिनंदन.’
पोस्टवर आणखी एकाने टिप्पणी केली, ‘तुम्ही भाग्यवान व्यक्ती आहात की पूनम मॅम आता तुमची आहे.’ दुसर्याने लिहिले, ‘वाह, अभिनंदन. आनंदी राहा आणि चांगले जीवन जगा.’ मे महिन्यात पूनम आणि सॅम यांच्यावर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून फिरायला जाण्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता असे समोर आले होते. मात्र, तिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती बातमी नाकारली असून, दावा केला आहे की ती घरी चित्रपट पाहत होती.
https://www.instagram.com/p/CC-b33fj_5F/?utm_source=ig_embed
तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे, ‘मित्रांनो, मी काल रात्री चित्रपट पाहत होती. मी बॅक-टू-बॅक तीन चित्रपट पाहिले, मला खूप मजा आली. काल रात्रीपासून मला फोन येत आहेत की मला अटक करण्यात आली आहे आणि मी बातम्यांमध्येही दिसत आहे. मित्रांनो, कृपया माझ्याबद्दल असे लिहू नका. मी घरी आहे आणि मी पूर्णपणे ठीक आहे. लव्ह यू ऑल.’ पूनम तेव्हा प्रसिद्ध झाली होती जेव्हा तिने 2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला तर कपडे उतरवण्याचे वचन दिले होते.’
2013 मध्ये तिने ‘नशा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली, जी आपल्या विद्यार्थ्यांकडे आकर्षित होते. दिग्दर्शक अमित सक्सेना यांनी आयएएनएसला सांगितले होते की चित्रपटाच्या सिक्वेलची योजना आखली जात आहे. ते म्हणाले होते, ‘हो, आम्ही पहिल्याच सिक्वेलबद्दल बोलत आहोत. कदाचित मी सिक्वेलचे दिगदर्शन करेन आणि असे केल्याने मला आनंद होईल, जर पूनम नशा 2 मध्ये असेल तर सिक्वेलमध्ये सातत्य राहील.’