Video : ‘किंग’ खानची लाडकी सुहाना Online घेतेय ‘बेली’ डान्सचे धडे ! फोटो झपाट्यानं व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसत आहे. सुहानानं आपल्या घरीच आपला बेली डान्स क्लास सुरू केला आहे. व्हिडीओ कॉलवरून सुहाना बेली डान्सचे धडे घेताना दिसली होती. तिची डान्स टीचर संजना मुथरेजा हिनं सुहानासोबत एक फोटो शेअर केला आहे जो झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

बेली डान्सर संजनानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती सुहाना खानसोबत दिसत आहे. हा फोटो गेल्यावर्षीचा आहे. संजनानं सुहाना आणि तिचा एक सेल्फी काढला होता जो सध्या सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

सुहाना खान सध्या मुंबईची डान्स ट्रेनर संजना मुथरेजा हिच्याकडून बेली डान्सचे धडे घेत आहे. सुहानानं काही दिवसांपूर्वीच एक फोटो शेअर केला होता ज्यात सुहाना आणि संजना व्हिडीओ कॉलवर गप्पा मारताना दिसत होत्या.

संजना मुंबईमधील प्रसिद्ध बेली डान्स ट्रेनर आहे. सुहाना व्यतिरीक्त शनाया कपूर, रकुल प्रीत सिंह, किम शर्मा, जॅकलीन फर्नांडिस असे अनेक स्टार्स संजनाकडून बेली डान्स शिकले आहेत.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.