Video : ‘या’ पध्दतीनं होळी साजरी करतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, पाहा ‘हे’ 5 इनसाईड व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मंगळवारला होळी आहे, पण सिनेजगतात होळीचे सेलिब्रेशन देखील सुरू झाले आहे. अंबानी कुटुंबीयांनी शुक्रवारी होळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात बॉलिवूड जगातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी सर्व अभिनेते आणि अभिनेत्रींनी जोरदार होळी खेळली. पार्टीसमोर दिसणार्‍या व्हिडिओमध्ये बॉलिवूड सेलेब्रिटीसुद्धा सामान्य माणसाप्रमाणेच होळी खेळतात असे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत नेहमी आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणाऱ्या अभिनेत्री कशी होळी खेळतात ते जाणून घेऊया…

व्हिडीओ 1

या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा फुल मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी ती इतर सेलेब्स ना भिजवण्याचा देखील प्रयत्न करीत आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अंबानी फॅमिली होळी पार्टीचाच आहे.

व्हिडीओ 2

https://www.instagram.com/p/B9bl8mQh4UY/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री डायना पेंटी ही डान्स करताना दिसत आहे. याव्यतिरिक्त ती विविध रंगांची उधळण करत आहे. डायना रंगात नाचत असून होळी पार्टीचा आनंद घेताना दिसली.

व्हिडीओ 3

या व्हिडिओमध्ये कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल आहेत. नुकत्याच विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या नात्याबाबत बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विक्की कौशल कतरिना कैफला रंग लावत आहे. आता कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे.

व्हिडीओ 4

हा व्हिडिओ निक जोनसचा आहे. व्हिडिओमध्ये निक जोनस सर्व सेलिब्रिटींबरोबर मजा करताना दिसत आहे. त्याच्या सोबत एक ड्रिंकची बॉटल देखील आहे. म्हणजेच बॉलिवूड पार्टीत दारू देखील असते, त्यासोबत होळी साजरी केली जाते.

व्हिडीओ 5

या व्हिडिओमध्ये निक जोनस प्रियंका चोप्रा सोबत गुलाल उडवताना दिसत आहे. त्याचवेळी जेव्हा हात अधिक गुलालाने भरतात तेव्हा तो प्रियंकाच्या कपड्यांना आपले हात पुसत साफ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर देखील खूप शेअर केला जात आहे.