सेमी फायनल मॅचपूर्वी एकत्र स्पॉट झाले विरुष्का ; चाहते म्हणाले, ‘भाई प्रॅक्टीस कर लो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या मँचेस्टरमध्ये आहे. आज भारत विरुद्ध न्यझिलंड वर्ल्ड कपची सेमी फायनल मॅच खेळली जाणार आहे. आज पूर्ण देश या मॅचची वाट पहात आहे. यावेळी पती विराट कोहली आणि टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा इग्लंडला पोहोचली आहे.

भारतीय वेळेनुसार, ही मॅच दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. याआधी विराट आणि अनुष्काचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दिसत आहे की, विराट आणि अनुष्काने सेम ड्रेस घातला आहे. विराटने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि ब्लॅक शॉर्ट घातली आहे तर अनुष्काने बिल्कुल असाच लुक केला आहे. फोटो पाहून वाटतं, कदाचित दोघे हॉटेलच्या बाहेर निघत आहेत. विराट अनुष्का हा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

‘भाई प्रॅक्टीस करलो, इनके साथ जिंदगीभर रहना है’

आजच्या मॅचला घेऊन देशभरातील जनतेला टीम इंडियाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी विराटला ट्रोल केले आहे. चाहत्यांचा म्हणणं आहे की, “भाई प्रॅक्टीस करलो, इनके साथ जिंदगीभर रहना है.” axilon_6.0 नावाच्या युजरने फोटोवर कमेंट केली आहे की, “जर मॅच चांगली झाली नाही तर तुझी कॅप्टनसी जाईल, मग आयुष्यभर अनुष्कासोबतच फिरत बस.”

अनुष्का गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली सोबतच आहे. भारत आणि श्रीलंका दरम्यान झालेल्या मॅचदरम्यानही अनुष्का पॅव्हेलियनमध्ये दिसली होती. तिने खाकी रंगाचा ड्रेस घातला होता. यानंतर विराट आणि अनुष्काचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. यात ती मँचेस्टरवरील रस्त्यांवर मस्ती करताना दिसली होती. यावेळी दोघांनी चाहत्यांसोबतही फोटो क्लिक केले होते.

https://www.instagram.com/p/BzpV3DUBuyd/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bzn6DiNF9KE/?utm_source=ig_embed

अनुष्का पती विराटला मॅचमध्ये सपोर्ट करण्यासाठी जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही खपूदा ती मॅच दरम्यान पव्हेलियनमध्ये दिसली आहे. यामुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे.

आरोग्यविषयक बातम्या

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई